शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

kolhapur: भोगावती कारखान्याच्या निवडणुकीस अखेर स्थगिती; राज्यातील सर्वच निवडणुका लांबणीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2023 12:29 IST

लोकमत’ने २१ जूनलाच ही निवडणूक स्थगित होणार असल्याचे वृत्त दिले होते

भोगावती : राज्याच्या सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाने पावसाळा आणि खरीप हंगाम सुरू झाल्याने राज्यातील सर्व निवडणुका बुधवारी, दि.३० सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलल्या. त्यामुळे परिते (ता. करवीर) येथील भोगावती सहकारी साखर कारखान्याची निवडणूकही लांबणीवर गेली. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण होऊन छाननी होण्याअगोदर निवडणूक कार्यक्रम स्थगित झाला. आता पावसाळ्यानंतर याच टप्प्यापासून निवडणूक कार्यक्रम सुरू होऊन मतदान होण्याची शक्यता आहे. ‘लोकमत’ने २१ जूनलाच ही निवडणूक स्थगित होणार असल्याचे वृत्त दिले होते.भोगावती कारखान्याचा निवडणूक कार्यक्रम २० जूनपासून सुरू झाला आहे. अर्ज दाखल करण्याची मुदत २७ जूनपर्यंत होती. संचालक मंडळाच्या २५ जागांसाठी ४८८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. आज गुरुवारी छाननी, १४ जुलैपर्यंत माघार आणि ३० जुलैला मतदान होणार होते. खरेतर पावसाळ्याचे कारण देऊन राज्य शासनाने भोगावतीच्या सीमेवर असलेल्या बिद्री कारखान्याची निवडणूक लांबणीवर टाकली आहे. त्यामुळे हा कार्यक्रम जाहीर झाला तेव्हाच त्याबाबत आश्चर्य व्यक्त केले होते. बिद्री कारखाना निवडणूक लांबणीवर ढकलण्याच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात गेला आहे. त्याची सुनावणी सोमवारी (दि.३ जुलै) होणार आहे. तोपर्यंत शासनाने सगळ्याच निवडणुका स्थगित करण्याचा निर्णय घेतला. आता कारखान्याचा साखर हंगाम, लोकसभेची रणधुमाळी व त्यातच कारखान्याची निवडणूक होणार आहे.

  • राज्यातील निवडणुकीस पात्र असलेल्या सहकारी संस्था : ८२ हजार ६३१
  • मतदार याद्या प्रसिद्ध झालेल्या संस्था : ४९ हजार ३३३
  • अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध संस्था : ४८ हजार ६६७
  • निवडणूक प्रक्रिया पूर्ण : ४२ हजार १५७
  • निवडणूक प्रक्रिया सुरू : ६ हजार ५१०

सहकार विभागाच्या आदेशानुसार भोगावती कारखान्याचा गुरुवार (दि.२९ जून)पासूनचा निवडणूक कार्यक्रम स्थगित करण्यात आला. त्यामुळे छाननी प्रक्रिया होणार नाही. नवीन सुधारित निवडणूक कार्यक्रम ऑक्टोबरमध्ये प्रसिद्ध होईल. त्यानुसार पुढील निवडणूक प्रक्रिया राबवली जाईल. -नीळकंठ करे, निवडणूक निर्णय अधिकारी भोगावती सहकारी साखर कारखाना परिते (ता. करवीर) 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखानेElectionनिवडणूक