भिडे स्पोर्टस ‘ब’ची बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:22 IST2021-03-20T04:22:51+5:302021-03-20T04:22:51+5:30

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे आयोजित केलेल्या वसंतराव चौगुले चषक ‘ब’क्रिकेट स्पर्धेत भिडे स्पोर्टसने मालती पाटील क्रिकेट अकॅडमीचा ...

Bhide Sports ‘B’ bet | भिडे स्पोर्टस ‘ब’ची बाजी

भिडे स्पोर्टस ‘ब’ची बाजी

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे आयोजित केलेल्या वसंतराव चौगुले चषक ‘ब’क्रिकेट स्पर्धेत भिडे स्पोर्टसने मालती पाटील क्रिकेट अकॅडमीचा २८८ धावांनी पराभव केला.

शाहू क्रीडांगण, कागल येथे शुक्रवारी झालेल्या स्पर्धेत प्रथम फलंदाजी करताना भिडे स्पोर्टसने ४० षटकांत ८ बाद ३६२ धावांचा डोंगर रचला. प्रवीण येडेकरने ८७, अनिकेत हतकरने ८४ आणि युवराज माडेकर ५६ धावांची तडाखेबंद फलंदाजी केली, तर शरद पाटीलने ३१, सुनील ओव्हळने नाबाद १९ व अवधूत पाटील याने २८ धावांची खेळी केली. गोलंदाजी करताना पाटील संघाकडून ईश्वर घोरपडे, इजाज शेख,अभिजित सणगर यांनी प्रत्येकी दोन, तर अब्दुलकादर देसाई व पृथ्वीराज निंबाळकर यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. उत्तरादाखल खेळताना पाटील संघाल हे आव्हान पेलवले नाही. त्यांच्या सर्व संघ १५. ३ षटकांत अवघ्या ७४ धावांत गुंडाळला. यात ईश्वर घोरपडेने नाबाद २७, सुनील पाटोळे यांनी १३ धावांची लक्षणीय खेळी केली. भिडे स्पोर्टसच्या शरद पाटीलने भेदक गोलंदाजी करीत तब्बल सात, तर देवदत्त महात्मे याने तीन बळी घेत संघाला सहज विजय मिळविण्यास हातभार लावला.

Web Title: Bhide Sports ‘B’ bet