वडिलोपार्जित घराच्या वाटणीवरून भावास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:17 IST2021-06-01T04:17:53+5:302021-06-01T04:17:53+5:30

कोल्हापूर : वडिलोपार्जित घराच्या वाटणीवरून दोघा भावांसह पुतण्यांनी लोखंडी सळई व कठीने बेदम मारहाण करण्याचा प्रकार घडला. मारहाणीत एकनाथ ...

Bhavas beaten over ancestral house allotment | वडिलोपार्जित घराच्या वाटणीवरून भावास मारहाण

वडिलोपार्जित घराच्या वाटणीवरून भावास मारहाण

कोल्हापूर : वडिलोपार्जित घराच्या वाटणीवरून दोघा भावांसह पुतण्यांनी लोखंडी सळई व कठीने बेदम मारहाण करण्याचा प्रकार घडला. मारहाणीत एकनाथ तुकाराम खाडे (वय ५२ रा. सांगरूळ, ता. करवीर) हे जखमी झाले. ही घटना रविवारी सायंकाळी गावात घडली. याप्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी : सांगरूळ येथे खाडे यांचे वडिलोपार्जित समाईक घर आहे. प्रल्हाद खाडे हे या जुन्या घराचे नवीन बांधकाम करत होते, त्यावेळी त्यांचे भाऊ एकनाथ खाडे यांनी त्यांना वडिलोपार्जित घर असल्याने त्याची प्रथम वाटणी करू असे सांगितले. त्या रागातून प्रल्हाद तुकाराम खाडे, युवराज तुकाराम खाडे या भावांसह प्रवीण प्रल्हाद खाडे, श्रीधर प्रल्हाद खाडे या पुतण्यांनी एकनाथ यांना शिवीगाळ करून त्याचे अंगावरील कपडे फाडले. तसेच लाथाबुक्क्यांनी, लोखंडी सळई, काठीने मारहाण करून जखमी केले. याबाबत करवीर पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा नोंदवला आहे.

Web Title: Bhavas beaten over ancestral house allotment