शहरं
Join us  
Trending Stories
1
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
2
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
3
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
4
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
5
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टी ७० अंकांच्या तेजीसह उघडला; मेटल-रियल्टी शेअर्समध्ये खरेदी
6
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
7
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
8
आधार कार्डापासून ते बॅंक अकाऊंट पर्यंत, १ नोव्हेंबरपासून बदलणार ‘हे’ ५ नियम; तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम
9
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
10
आंतरराष्ट्रीय जुजित्सू खेळाडू रोहिणी कलम यांनी आयुष्य संपविले; एक फोन आला आणि ती खोलीत गेली...
11
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
12
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
13
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
14
टॅरिफची धमकी मिळाल्याने थायलंड-कंबोडियात युद्धबंदी; ट्रम्प यांच्या आणखी एका मध्यस्थीला मिळाले यश
15
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
16
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
17
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
18
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
19
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश
20
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार

अमित शाह केंद्रीय गृहमंत्री की पुजारी?; शरद पवारांचा टोला, उद्धव ठाकरेंचीही घेतली बाजू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2023 07:40 IST

महाराष्ट्रात महाविकास आघाडी एकत्र असल्याचाही केला दावा

कोल्हापूर : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेला सर्वसामान्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे देशभरात सत्ताधाऱ्यांच्या विरोधात एकत्र येण्यासाठी या यात्रेची मदत होईल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला. ते कोल्हापूरमध्ये रविवारी सकाळी पत्रकारांशी बोलत होते.

पवार म्हणाले, भारत जोडो यात्रेवरही टीका झाली परंतु राहुल गांधींची यात्रा केवळ काँग्रेसपुरती राहिली नाही. महाराष्ट्रात जयंत पाटील, सुप्रिया सुळे त्यात सहभागी झाले. गांधी विचार मानणाऱ्या संस्था, संघटनाही सहभागी झाल्या. सामान्यांनी या पदयात्रेला चांगला प्रतिसाद दिल्याने भाजपने त्यांच्याविषयी केलेल्या दूषित वातावरणाला चांगले उत्तर मिळाले.

राज्यातील आरोप-प्रत्यारोपांचा दर्जा घसरला आहे. तो टाळण्यासाठी सुप्रिया सुळे या देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणार आहेत. याबाबत विचारले असता पवार म्हणाले, हे काही थांबणार नाही. परंतु, सत्तेवर आल्यानंतर पाय जमिनीवर हवेत. तुरूंगात घालीन, जामीन रद्द करतो ही राजकीय नेत्यांची भूमिका असू शकत नाही. कोणीही टोकाची भूमिका घेणे योग्य नाही.  

राज्यपालांविषयी नाखूशच

महाराष्ट्राच्या राज्यपालांविषयी आम्हीही नाखूश असून, उत्तम राज्यपालांची महाराष्ट्राला परंपरा होती. परंतु हे असे पहिले राज्यपाल आहेत की, ज्यांनी सातत्याने वादग्रस्त वक्तव्ये केली. त्यांनी पदाची प्रतिष्ठा राखली नाही, अशी टीकाही पवार यांनी यावेळी केली. 

पवार म्हणाले....

सीमाप्रश्नी उत्तम वकील देऊन सर्वोच्च न्यायालयात मजबूतपणे बाजू मांडण्याची गरज.जातनिहाय गणना व्हावी, ही आमचीही मागणी. नितीशकुमार यांचे याबद्दल अभिनंदन.सरकार पाडण्यासाठी संजय राऊत यांनी काही नियोजन केले का, याची माहिती घेतो.संभाजीराजे यांना स्वराज्यरक्षक म्हणण्यात काहीही चुकीचे नाही.महाविकास  आघाडीला रिपब्लिकन पक्षाच्या काही गटांसह इतरांना सोबत घेऊन निवडणुका लढविण्यात फारशी अडचण येणार नाही.

कडवा शिवसैनिक उद्धव ठाकरेंसोबत 

जरी उद्धव ठाकरे यांच्यापासून काहीजण बाजूला गेले असले तरी कडवा, प्रत्यक्षात काम करणारा शिवसैनिक ठाकरे यांच्याबरोबरच असल्याचे माझे निरीक्षण आहे. याला कोल्हापूरही अपवाद नाही. त्यामुळे जे खासदार, आमदार शिवसेनेतून बाहेर पडले आहेत, त्यांना येणाऱ्या निवडणुकांवेळी जनतेच्या भावना काय आहेत हे लक्षात येईल, असे पवार यांनी सांगितले.

केंद्रीय गृहमंत्री की पुजारी?

राम मंदिर कधी बांधून पूर्ण होणार, हे पुजाऱ्यांनी सांगणे अपेक्षित असताना त्यांचे काम केंद्रीय गृहमंत्री करत आहेत, असा टोलाही पवार यांनी अमित शहा यांना लगावला.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसUddhav Thackerayउद्धव ठाकरेAmit Shahअमित शाह