करवीर तालुका पश्चिम भागात ‘भारत बंद’ आंदोलन यशस्वी करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:20 IST2020-12-08T04:20:21+5:302020-12-08T04:20:21+5:30
यावेळी बोलताना करवीर पंचायत समितीचे माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी म्हणाले, केंद्र शासनाने तीन कृषी कायदे केल्यामुळे देशातील शेतकरी देशोधडीला ...

करवीर तालुका पश्चिम भागात ‘भारत बंद’ आंदोलन यशस्वी करणार
यावेळी बोलताना करवीर पंचायत समितीचे माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी म्हणाले, केंद्र शासनाने तीन कृषी कायदे केल्यामुळे देशातील शेतकरी देशोधडीला लागणार आहेत. कृषिप्रधान या देशात शेतकऱ्यांना न्याय मागण्यासाठी झगडावे लागते. बैठकीत यशवंत बँकेचे संचालक उत्तम पाटील (कोगे) काँग्रेस नेते सज्जन पाटील, ग्राहक महाराष्ट्र पंचायतचे जिल्हा उपाध्यक्ष जगदीश पाटील (महे), माजी सरपंच पंडित दुर्गुळे (गणेशवाडी), बाजीराव पाटील (मांढरे), आदींनी मनोगत व्यक्त केले. बैठकीला बीडशेड व्यापारी, शेतकरी उपस्थित होते.
फोटो ओळ - कसबा बीड ( ता . करवीर ) येथे भारत बंद आंदोलन .करण्यासाठी आयोजित व्यापक काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलताना काँग्रेस नेते राजेंद्र सूर्यवंशी, शेजारी बाजीराव पाटील, कृष्णात पाटील, जगदीश पाटील, उत्तम पाटील, तानाजी माने व इतर मान्यवर उपस्थित होते.