निपाणीतील ‘ऑक्सिजन’ संशोधक भालचंद्र काकडे यांचे चटका लावणारे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:25 IST2021-05-08T04:25:38+5:302021-05-08T04:25:38+5:30
डॉ. काकडे चेन्नईतील एसआरएम रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये कार्यरत होते. ते संशोधन करणाऱ्या लॅबमध्ये काही पॉझिटिव्ह रुग्ण सापडले. त्यावर डॉ. काकडे ...

निपाणीतील ‘ऑक्सिजन’ संशोधक भालचंद्र काकडे यांचे चटका लावणारे निधन
डॉ. काकडे चेन्नईतील एसआरएम रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये कार्यरत होते. ते संशोधन करणाऱ्या लॅबमध्ये काही पॉझिटिव्ह रुग्ण सापडले. त्यावर डॉ. काकडे यांची कोरोनाची चाचणी करण्यात आली. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर दोन-तीन दिवसांमध्ये त्यांना श्वसनास त्रास सुरू झाला. त्यांच्या विद्यार्थ्यांनी त्यांना तेथील शासकीय कोविड सेंटरमध्ये दाखल केले. त्यांना ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, औषधे उपलब्ध करून देण्यासाठी त्यांचे विद्यार्थी धडपडत होते. मात्र, ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे डॉ. काकडे यांना वाचविण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. ऑक्सिजन, हायड्रोजन क्षेत्रात महत्त्वपूर्ण संशोधन करणाऱ्या दिग्गज संशोधकाचे निधन मनाला चटका लावणारे आहे.
चौकट
इंधननिर्मिती, प्लॅॅटिनम संशोधनातील सात पेटंट
डॉ. काकडे यांनी सन २००० मध्ये शिवाजी विद्यापीठातून रसायनशास्त्राची पदवी घेतली. काही दिवस त्यांनी देवचंद कॉलेजमध्ये हंगामी प्राध्यापक म्हणून काम केले. पुढे त्यांनी पुण्यातील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत डॉ. विजय मोहन यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी. पूर्ण केली. जपानमधील टोकियो इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये इंधन निर्मितीबाबत संशोधन केले. इंधन निर्मिती व प्लॅटिनमच्या विविध संशोधनात आंतरराष्ट्रीय स्तरावर सात पेटंटही मिळवले. मनमिळाऊ स्वभावाच्या डॉ. काकडे यांनी कोल्हापूरमधील अनेक विद्यार्थ्यांना शिक्षण, संशोधन, नोकरीसाठी मदत केली.
फोटो (०७०५२०२१-कोल-भालचंद्र काकडे (निधन),०१
===Photopath===
070521\07kol_12_07052021_5.jpg~070521\07kol_13_07052021_5.jpg
===Caption===
फोटो (०७०५२०२१-कोल-भालचंद्र काकडे (निधन),०१~फोटो (०७०५२०२१-कोल-भालचंद्र काकडे (निधन),०१