सावरवाडी येथील भैरवनाथ जन्मोत्सव साधेपणाने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 05:00 IST2020-12-05T05:00:38+5:302020-12-05T05:00:38+5:30
सावरवाडी : सावरवाडी (ता. करवीर) येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथाचा सोमवारी (दि. ७) होणारा जन्मोत्सव सोहळा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अगदी साधेपणाने ...

सावरवाडी येथील भैरवनाथ जन्मोत्सव साधेपणाने
सावरवाडी : सावरवाडी (ता. करवीर) येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथाचा सोमवारी (दि. ७) होणारा जन्मोत्सव सोहळा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अगदी साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे, असा निर्णय गावसभेत घेण्यात आला. धार्मिक कार्यक्रम वगळता सांस्कृतिक व मनोरंजनाचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. या वर्षी कोरोनामुळे भैरवनाथ जन्मोत्सव सोहळा साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे. मंदिरात धार्मिक विधी मोजक्यात लोकांच्या उपस्थितीत करण्यात येतील. मास्क वापर, सॅनिटायझरचा वापर व सामाजिक अंतर ठेवून मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पालखी सोहळा व जन्मोत्सव सोहळा होणार आहे, अशी माहिती श्री भैरवनाथ सेवा मंडळाच्या वतीने दिली आहे.