शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

अपंग असूनही शिक्षणासाठी लढली, थेट इंग्लंडमधून मदत आली; कोल्हापुरातील भाग्यश्री जाधवचा असाही संघर्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 13:28 IST

कोल्हापूर : वडील बेकरी पदार्थाचे विक्रेते, स्वत:ही पायाने अधू असल्याने आलेले कायमचे अपंगत्व. मात्र, उच्च शिक्षण घ्यायचेच, ही खूणगाठ ...

कोल्हापूर : वडील बेकरी पदार्थाचे विक्रेते, स्वत:ही पायाने अधू असल्याने आलेले कायमचे अपंगत्व. मात्र, उच्च शिक्षण घ्यायचेच, ही खूणगाठ बांधल्याने तिच्या जिद्दीपुढे नियतीनेही हात टेकले. याच जिद्दीतून तिने सीईटीला ९७.४७ पर्सेंटाईल मिळवत कोल्हापूर येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालयात प्रवेश मिळवला. मात्र, येथील कृषी महाविद्यालयाच्या विस्तीर्ण परिसरात विखुरलेल्या प्रयोगशाळा आणि वर्गांमध्ये हजेरी लावणे तिच्या अपंगत्वामुळे अवघड होत असल्याचे लक्षात येताच वोकहार्ट या फार्मसी कंपनीचे इंग्लंडमध्ये कार्यरत शशांक कांबळे, कोल्हापूरचे अमित माटे आणि उपेंद्र गोखले या दानशुरांनी तिला बॅटरीवर चालणारी स्वयंचलित तीनचाकी सायकल देत तिचा अडखळत सुरू असलेला प्रवास सुसाट केला आहे. भाग्यश्री जाधव असे या जिद्दी मुलीचे नाव. शासकीय कृषी महाविद्यालयात प्रथम वर्षाचे शिक्षण घेत असलेली भाग्यश्री पायाने अधू आहे. अपंगत्वावर मात करत तिने बारावीपर्यंत चांगले गुण मिळवले. वैद्यकीय प्रवेशासाठीच्या नीटमध्ये चांगले गुण मिळवूनही तिचा शंभर टक्के अपंगत्वाचा दाखला आड आला. परिणामी तिची मेडिकलच्या प्रवेशाची संधी हुकली. मात्र सीईटीला ९७.४७ पर्सेंटाईल मिळवत तिने येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालयात प्रवेश मिळवला. 

कृषी महाविद्यालयाच्या परिसरात विखुरलेल्या प्रयोगशाळा आणि वर्गांमध्ये हजेरी लावणे तिला अवघड होते. तरीही तिने पहिल्या सत्रात आपला शैक्षणिक आलेख उंचावत ठेवला. आपल्या अपंगत्वाला आपल्या आकांक्षांच्या आड येऊ न देता ती मैत्रिणींच्या मदतीने प्रत्येक वर्ग आणि प्रात्यक्षिक प्रक्षेत्रावर पोहोचायची. तिच्या आर्थिक परिस्थितीची जाणीव असल्याने कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी कल्याण अधिकारी अजय देशपांडे यांनी वोकहार्ट या फार्मसी कंपनीचे इंग्लंडमध्ये कार्यरत असलेले शशांक कांबळे यांच्याशी संपर्क साधला.कांबळे यांच्यासह अमित माटे आणि उपेंद्र गोखले या तीन मित्रांनी बॅटरीवर चालणारी स्वयंचलित तीनचाकी सायकल भाग्यश्रीला घेऊन दिली. कृषी महाविद्यालयात झालेल्या एका कार्यक्रमात सहयोगी अधिष्ठाता डॉ. सतीश बुलबुले यांच्या हस्ते तिला ही सायकल प्रदान केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरEducation Sectorशिक्षण क्षेत्रStudentविद्यार्थीLondonलंडन