बेळगावचे महापौर-उपमहापौरच करताहेत ‘बेळगावी’चा वापर

By Admin | Updated: November 29, 2014 00:29 IST2014-11-29T00:21:55+5:302014-11-29T00:29:08+5:30

महाराष्ट्र एकीकरणचे ‘बेळगाव’लाच प्राधान्य

The Belgaum Mayor - Deputy Mayor is using 'Belgaavi' | बेळगावचे महापौर-उपमहापौरच करताहेत ‘बेळगावी’चा वापर

बेळगावचे महापौर-उपमहापौरच करताहेत ‘बेळगावी’चा वापर

बेळगाव : केंद्रीय गृहमंत्रालयाने बेळगावचे नाव बदलून ‘बेळगावी’ करायला परवानगी दिल्यानंतर जिल्हाधिकारी एन. जयराम यांनी सरकारी कार्यालये, हॉटेल्स, दुकानदार व खासगी संस्थांना फलकांवर ‘बेळगावी’ असाच उल्लेख करावा, असा आदेश आहे.
मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने बेळगावी नामांतराबाबत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करणार आहे. न घाबरता व्यापाऱ्यांनी, दुकानदारांनी बेळगाव हेच नाव वापरात आणावे, असे आवाहन केल्यानंतर आता चक्क महापौर आणि उपमहापौर यांनीच ‘बेळगावी’ नाव वापरण्यास सुरुवात केली आहे.
महापौर महेश नाईक व उपमहापौर रेणू मुतगेकर यांच्या सरकारी कारवर बेळगाव शहराच्या नावाचा उल्लेख बेळगावी असा आहे. सरकारी गाड्या हे मराठी भाषिक लोकप्रतिनिधी घेऊन शहरभर फिरत आहेत. महापौर-उपमहापौरांच्या या धोरणामुळे मराठी भाषिकांत तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
सीमाभागातील मराठी जनतेची अस्मिता अशी ओळख असणाऱ्या बेळगाव महापालिकेवरचा भगवा ध्वज हटवून कानडीकरण करण्याचा सपाटा कर्नाटक सरकारने लावला आहे. महापौर-उपमहापौर यांच्या धरसोड भूमिकेमुळे सीमाभागातील जनता नाराज आहे. या अगोदरच्या महापौर-उपमहापौरांच्या गाडीवरही भगवा ध्वज लावण्यात येत होता, मात्र माजी महापौर विजय मोरे यांच्या कारकिर्दीत ही परंपरा खंडित झाली होती.
सध्या महापालिकेत मराठी भाषिकांची सत्ता असून, महापौर-उपमहापौर आणि दोन आमदार मराठी भाषिक आहेत, मात्र कानडी सरकार कारवाई करेल, या भीतीने या लोकप्रतिनिधींना मराठी अस्मितेचा विसर पडला आहे. मराठी भाषिकांना झालेल्या येळ्ळूरातील मारहाणीबद्दल संसदेत पडसाद उमटले, बेळगावी नामांतर सुरू आहे. महापालिकांच्या सभेत याला विरोधऐवजी बेळगावी नावाचा आधार हे घेत आहेत.

Web Title: The Belgaum Mayor - Deputy Mayor is using 'Belgaavi'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.