कुष्ठरोग बांधवांचे भीख मांगो आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:58 IST2020-12-05T04:58:13+5:302020-12-05T04:58:13+5:30
कोल्हापूर : कुष्ठरोग बांधवांचे गेल्या आठ महिन्यांपासून रखडलेले मानधन तत्काळ खात्यावर जमा करा, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीने शुक्रवारी ...

कुष्ठरोग बांधवांचे भीख मांगो आंदोलन
कोल्हापूर : कुष्ठरोग बांधवांचे गेल्या आठ महिन्यांपासून रखडलेले मानधन तत्काळ खात्यावर जमा करा, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीने शुक्रवारी भीख मांगो आंदोलन केले. कुष्ठरोग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी रस्त्याने भीक मागत येऊन महापालिकेसमोर सुमारे दीड तास निदर्शने केली. यावेळी उपायुक्त निखिल मोरे यांनी त्यांची भेट घेऊन मंगळवारी सर्वांचे पैसे जमा केले जातील, अशी ग्वाही दिली.
महापालिकेच्या अधिनियमांनुसार कुष्ठरोग बांधवांच्या पालनपोषणाची जबाबदारी महापालिकेची आहे. वैद्यकीय खर्चाची तरतूद महापालिकेनेच करायची आहे. असे असताना कोरोनामध्ये प्रशासनाने ही जबाबदारी झटकण्याचे काम केले. कोरोनामध्ये मंदिर बंद असल्याने कुष्ठरोग बांधवांवर उपासमारीची वेळ आली. अशी स्थिती असतानाच महापालिकेने गेल्या आठ महिन्यांपासून मानधन दिलेले नाही. ८० लाभार्थ्यांचा यामध्ये समावेश आहे. ही रक्कम तत्काळ खात्यावर जमा व्हावी. तसेच कल्याण डोंबिवली, महानगरपालिकेप्रमाणे कोल्हापूर महापालिकेनेही २५०० रुपये मानधन सुरू करावे, अशी मागणीही केली. यावेळी डॉ. आनंदराव गुरव, विलास कांबळे, संजय गुदगे, संभाजी कागलकर, सूरज लिगारे, प्रवीण बनसोडे, अविनाश बनगे, आदी उपस्थित होते.
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले.
फोटो : ०४१२२०२० कोल केएमसी कुष्ठरोग आंदोलन
ओळी : रखडलेल्या मानधनासाठी कुष्ठरोग बांधवांनी कोल्हापूर महापालिकेसमोर ठिय्या आंदोलन केले. उपायुक्त निखिल मोरे यांनी त्यांचे निवेदन स्वीकारले.