शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
3
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
4
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
5
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
6
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
7
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
8
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
9
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
10
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ
11
Nobel Prize: सुसुमू कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि उमर याघी यांना रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर
12
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
13
ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकत इतिहास रचला! त्या अमन सेहरावतला आखाड्यात उतरण्यावर बंदी; जाणून घ्या कारण
14
पुण्यातील विठ्ठल भक्तांवर पंढरपुरात हल्ला करणारे 'ते' तिघे कोण? वाद इतका विकोपाला का गेला?
15
पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन; मुंबई-पुणेकरांना मोठा दिलासा!
16
देशातल्या खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेनं दिलं खास दिवाळी गिफ्ट, आपल्याला कसा होणार फायदा? जाणून घ्या
17
प्रीमियम लूक, इंटीरियरमध्ये लक्झरी आणि स्पोर्टी टच; टोयोटा फॉर्च्यूनर लीडर भारतात लॉन्च!
18
रशियात शिकायला गेला आणि सैन्यात भरती झाला, अखेर युक्रेनी सैन्यासमोर सरेंडर, गुजराती तरुणासोबत काय घडलं? 
19
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता एकाच App मध्ये मिळणार बस, ट्रेन आणि मेट्रोचे तिकीट...
20
बॉलिवूड हादरलं! 'झुंड' फेम अभिनेत्याची निर्घृण हत्या, अर्धनग्नावस्थेत आढळला प्रियांशूचा मृतदेह

Kolhapur: शिवाजी विद्यापीठात मधमाशांचे मोहळ उठले, हल्ल्यात पाचजण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 16:18 IST

सोनचाफ्याच्या फुलामुळेच हल्ला

कोल्हापूर : वार मंगळवार..वेळ सकाळी १० ची..स्थळ शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य इमारतीचे प्रवेशद्वार..विद्यापीठातीलच एक महिला कर्मचारी मुख्य इमारतीत प्रवेश करताना याच इमारतीच्या भिंतीवरील मधमाशांनी अचानक संबंधित महिला कर्मचाऱ्यांवर हल्ला केला अन् एकच धावपळ उडाली. त्या महिला कर्मचाऱ्यास वाचविण्यासाठी धावलेल्या तिच्या पतीसह विद्यापीठातील आणखी तिघा कर्मचाऱ्यांनाही मधमाशांनी हल्ला करून जखमी केले. अचानक मधमाशांचे मोहोळ उठल्याने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून कुलसचिवांसह विद्यापीठातील उपस्थित सर्वच कर्मचाऱ्यांनी खिडक्यांचे पडदे टाकून संबंधित महिला व इतर कर्मचाऱ्यांना मधमाशांपासून वाचविण्याचा प्रयत्न केला. अगदी दहा-पंधरा मिनिटांच्या या थराराने विद्यापीठातील मंगळवारची सकाळ भीतीच्या छायेने दाटून गेली.शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य इमारतीच्या पिछाडीस मधमाशांचे पोळ बसले आहे. मंगळवारी सकाळी प्रशासकीय कर्मचारी मुख्य इमारतीत प्रवेश करत असताना अचानक मधमाशांचे पोळ उठून मधमाशांनी एका महिला कर्मचाऱ्यावर हल्ला केला. यावेळी तेथे उपस्थित महिलेच्या पतीसह दोन सुरक्षारक्षक व एका कर्मचाऱ्याने महिलेला वाचवण्यासाठी धाव घेतली. यात मधमाशांनी उर्वरित चौघांनाही चावा घेऊन जखमी केले. त्यांना तत्काळ विद्यापीठाच्या आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यातील एकाला जास्त प्रमाणात मधमाशा चावल्याने त्यांना पुढील उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल केले.

सोनचाफ्याच्या फुलामुळेच हल्लासोनचाफ्याची फुले मधमाशांना आकर्षित करतात. मधमाशांना सोनचाफ्याचा वास लगेच येतो. हा हल्ला झाला त्यावेळी संबंधित कर्मचारी महिलेच्या हातात सोनचाफा होता असे प्रत्यक्षदर्शिनी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur University Bee Attack: Five Injured Rescuing Employee

Web Summary : Bee swarm attacks at Shivaji University, Kolhapur, injured five, including an employee and rescuers. A Tiare flower may have attracted the bees. One victim required advanced care.