शहरं
Join us  
Trending Stories
1
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
2
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
3
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
4
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
5
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य तिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
6
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
7
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
8
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
9
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?
10
वर्ल्डकप विजेता कर्णधार MS Dhoni केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या भेटीला, Video केला शेअर
11
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात 'वाजले की बारा' लावणी; सुनेत्रा पवारांचा थेट शहराध्यक्षांना कॉल
12
"व्हायरल होईल माहित होतं पण...", आर्यन खानच्या सीरिजमधील कॅमिओवर इम्रान हाश्मी म्हणाला...
13
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी भारतीय महिला संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे आघाडीची फलंदाज स्पर्धेबाहेर 
14
निवडणूक आयोगाने देशात 'मतदार यादी दुरुस्ती' मोहिमची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक
15
घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा, म्हणाले...
16
शेअर बाजार 'रॉकेट'! PSU बँक, रियल्टी आणि ऑटो स्टॉक्सला मागणी; पहा सेन्सेक्सच्या टॉप ५ कंपन्या
17
दोन जणांची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लैंगिक छळ अन् 'HIV'चा उल्लेख...! अरुणाचल पोलिसांकडून फरार IAS अधिकाऱ्याला अटक 
18
कंगना रणौत भटिंडा न्यायालयात हजर, शेतकरी आंदोलनादरम्यान केलेल्या 'त्या' टिप्पणीबद्दल मागितली माफी
19
धक्कादायक! तूप, दारू आणि स्फोट...UPSC विद्यार्थ्याच्या लिव्ह-इन पार्टनरकडून भीषण हत्या
20
३ दिवसांपासून रॉकेट बनलाय 'हा' शेअर; सातत्यानं लागतंय अपर सर्किट, आता डिविडेंड देण्याचीही तयारी

Kolhapur: गवंडी काम सोडले, 'मधुमक्षिका पालनातून लाखो रुपये कमवले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2023 19:36 IST

दुर्वा दळवी  कोल्हापूर : सह्याद्री डोंगररांगांच्या पायथ्याशी वसलेलं कोल्हापूर जिल्ह्यातील एक गाव सध्या मधाचे गाव म्हणून ओळखले जात आहे. ...

दुर्वा दळवी कोल्हापूर : सह्याद्री डोंगररांगांच्या पायथ्याशी वसलेलं कोल्हापूर जिल्ह्यातील एक गाव सध्या मधाचे गाव म्हणून ओळखले जात आहे. या गावातील ग्रामस्थ मधाचे उत्पादन घेऊन वर्षाकाठी लाखो रुपये कमावित आहेत. भुदरगड तालुक्यातील पाटगाव हे निसर्गरम्य आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल गाव. पाटगाव अंतर्गत शिवडाव, अंतुर्ली, मठगाव, भारमलवाडी, डेळे, चांदमवाडी, मानी, तळी, भटवाडी या गावात ही मधमाशा पालन उद्योग केला जातो. वर्षभरात साधारण पणे ८ ते १० टन मधाचे उत्पादन घेतले जाते. याच ठिकाणचे मधपाळ धर्माजी कांबळे हे आज पूर्णवेळ मधाचे उत्पादन घेत असून त्यांचे वार्षिक नफा तीन ते चार लाख इतका कमावतात. धर्माजी पूर्वी गवंडी काम करत होते त्यासोबत ते मधमाशी पालन करून मधाचे उत्पादन घेत असत. खादी ग्रामोद्योग यांच्या मार्फत त्यांना मध उत्पादनाचे प्रशिक्षण देण्यात आले होते. गेल्या दोन वर्षांपासून पूर्णवेळ मधाचे उत्पादन ते घेत आहेत. या व्यवसायातून वर्षाकाठी सुमारे 450 ते 500 किलो मधाची निर्मिती धर्माजी करतात. निसर्गसंपन्न परिसर असल्याने शुद्ध आणि नैसर्गिक मधाचे उत्पादन धर्माजी घेत असून या मधाला राज्यासह देशात ही मागणी वाढली आहे. धर्माजी यांच्याप्रमाणे पाटगाव येथील अनेक शेतकरी, ग्रामस्थ मधाचे उत्पादन घेऊन चांगला नफा ही मिळवतात अन् बाजारात या मधाला मागणी ही अधिक आहे. मधाचे गाव म्हणून ओळख असणाऱ्या पाटगावने अनेकांना मध निर्मितीतून वेगळी ओळख दिली आहे. एकेकाळी गवंडी काम करणारे धर्माजी शुद्ध मधाचे उत्पादन घेऊन चांगला नफा कमवू लागले आहेत. त्यामुळे मध निर्मिती ही नव्या व्यवसायाची संधी ग्रामीण भागातील युवकासाठी उपलब्ध झाली आहे. 

मध निर्मिती ते वसाहत निर्मितीधर्माजी स्वतः मधाचे उत्पादन घेत असून यातून त्यांना चांगला नफा ही मिळत आहे. मधपाळ म्हणून काम करणाऱ्यांना ते मधुमक्षिका पालन कसे करावे याचे प्रशिक्षण ही देतात. तसेच मधमाश्यांच्या वसाहती निर्माण करून त्यांनी आजवर 100 हून अधिक वसाहतींची विक्री केली आहे. 

समाजात मधपाळ म्हणून मान सन्मान मिळालाएकेकाळी गवंडी काम करणारे धर्माजी आज मध निर्मितीत अग्रेसर ठरले आहेत. नव्या व्यवसायाने त्यांना एक नवी ओळख मिळाल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. मध निर्मितीतून निसर्ग संवर्धनासाठी मोलाचा वाटा उचलण्याची संधी मिळते या कार्याचा त्यांना अभिमान वाटतो. - धर्माजी कांबळे, मधपाळ, अंतूर्ली

टॅग्स :kolhapurकोल्हापूर