कॅफे की कुंटनखाना? टाकाळा परिसरात कॅफेत आढळले बेड, निरोधची पाकिटे!
By उद्धव गोडसे | Updated: September 26, 2023 15:14 IST2023-09-26T15:13:58+5:302023-09-26T15:14:59+5:30
या कारवाईमुळे कॅफेच्या काळ्या काचांमागे सुरू असलेले अवैध धंदे समोर आले आहेत.

कॅफे की कुंटनखाना? टाकाळा परिसरात कॅफेत आढळले बेड, निरोधची पाकिटे!
कोल्हापूर : येथील टाकाळा परिसरातील टोकियो कॅफेमध्ये निर्भया पथकाने मंगळवारी (दि. २६) दुपारी छापा टाकून केलेल्या कारवाईत बेड आणि निरोधची पाकिटे आढळली. या कारवाईमुळे कॅफेच्या काळ्या काचांमागे सुरू असलेले अवैध धंदे समोर आले आहेत.
याप्रकरणी पोलिसांनी कॅफे चालकासह १२ तरुण, तरुणींना चौकशीसाठी ताब्यात घेतले. शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी कॅफेच्या नावाखाली अवैध धंदे सुरू आहेत. तरुण-तरुणींच्या अश्लील चाळ्यांचे अड्डे बनलेले कॅफे गुन्हेगारीला निमंत्रण देत आहेत. यामुळे कॅफेंवर कारवाई करण्याची मोहीम निर्भया पथकाने सुरू केली आहे.
मंगळवारी टाकाळा येथील टोकियो कॅफेवर छापा टाकून पथकाने झडती घेतली असता, कॅफेमध्ये बेड आणि निरोधची पाकिटे आढळली. याबाबत कॅफे चालकाकडे पथकाने विचारणा केली. मात्र, त्याला समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत. कॅफेमध्ये अश्लील चाळे करणा-या १२ तरुण-तरुणींना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. कॅफेच्या नावाखाली छुपे कुंटनखाने सुरू असल्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.