आर्थिक देवाण-घेवाणीवरून महिलेस मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 05:00 IST2020-12-05T05:00:43+5:302020-12-05T05:00:43+5:30
इचलकरंजी : येथील साईट नं. १०२ मध्ये आर्थिक देवाण-घेवाणीवरून एका महिलेस घरात घुसून लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. दरवाज्यासह घरातील ...

आर्थिक देवाण-घेवाणीवरून महिलेस मारहाण
इचलकरंजी : येथील साईट नं. १०२ मध्ये आर्थिक देवाण-घेवाणीवरून एका महिलेस घरात घुसून लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. दरवाज्यासह घरातील साहित्याची तोडफोड केली. याप्रकरणी दोन महिलांसह चौघांविरोधात गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी नूरजहॉँ सय्यद घुणकी (वय ४५) यांनी तक्रार दिली आहे.
जयश्री चौगुले आणि मानसी चौगुले (दोघी रा. लालनगर) व अन्य दोन अनोळखी यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. नूरजहॉँ व जयश्री आणि मानसी या एकमेकीच्या ओळखीच्या असून नूरजहॉँ यांच्या ओळखीतील सत्यव्वा या महिलेस हातउसने दिलेले पैसे परत मागण्याच्या कारणावरून हा प्रकार घडला.