शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

लोकशाही टिकवण्यासाठी संघर्षाला तयार रहा, सतेज पाटील यांचे आवाहन

By पोपट केशव पवार | Updated: November 20, 2023 16:28 IST

'आयटक'च्यावतीने शाहूनगरी ते दीक्षाभूमी महासंघर्ष यात्रेला प्रारंभ, १८ डिसेंबरला ही यात्रा नागपूरला पोहोचणार

कोल्हापूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राज्यघटनेने देशाला प्रबळ केले. मात्र, हीच घटना मोडीत काढण्याचे काम सत्ताधाऱ्यांकडून सुरू आहे. आपण याविरोधात काहीच केले नाही तर कदाचित २०२४ च्या देशातील शेवटच्या निवडणुका ठरतील. त्यामुळे या देशातील लोकशाही टिकवायची असेल तर आपण सर्वांनी एकजुटीने याविरोधात संघर्ष करू या, असे आवाहन माजी मंत्री, आमदार सतेज पाटील यांनी सोमवारी केले. ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसतर्फे (आयटक) शाहूनगरी ते दीक्षाभूमी अशी महासंघर्ष यात्रा आयोजित केली आहे. या यात्रेला कोल्हापुरातील गोविंद पानसरे यांच्या स्मारकाजवळ आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या यात्रेला प्रारंभ झाला. या वेळी आयटकच्या पदाधिकाऱ्यांनी 'भाजप हटाव, देश बचाव' या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. १८ डिसेंबरला ही यात्रा नागपूरला पोहोचणार असून येथे हिवाळी अधिवेशनावर विराट मोर्चाद्वारे तिचा समारोप होईल.सतेज पाटील म्हणाले, सरकारने लागू केलेली जीएसटी सामान्यांचे कंबरडे मोडणारी आहे. जाती-जातीत तणाव निर्माण करण्याचे काम सत्ताधारी करत आहेत. त्यामुळे या सरकारविरोधात प्रचंड असंतोष असून त्यासाठी 'भाजप हटाव, देश बचाव' हा नारा अधिक बुलंद करायला हवा. सरकारने उद्योगपतींची १४ हजार कोटींची कर्जे माफ केली, पण सर्वसामान्य माणसांना कोणताच आधार दिला नाही. घटना आता धोक्यात आली आहे.आमदार जयश्री जाधव म्हणाल्या, लोकशाही टिकवण्यासाठी भाजपला सत्तेवरून हटविणे गरजेचे आहे. आयटकचे जनरल सेक्रेटरी शाम काळे म्हणाले, आमचा वसा आणि वारसा शाहू महाराज आहेत. त्यामुळे देश वाचवण्यासाठी शाहूनगरीतून ही यात्रा काढली. या वेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, सुभाष लांडे यांनी मनोगत व्यक्त केले. या वेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर. के. पोवार, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, सी. एन. देशमुख, भारती पोवार, प्रकाश बनसोडे, राजू देसले, बबली रावत, सतीशचंद्र कांबळे, दिलीप पवार, कृष्णा भोयर उपस्थित होते. शाहीर सदाशिव निकम यांनी स्वागत केले. एस. बी. पाटील यांनी आभार मानले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरnagpurनागपूरSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलBJPभाजपा