शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
4
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
5
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
7
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
8
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
9
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
10
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
11
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
12
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
13
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
14
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
15
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
16
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
17
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
18
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
19
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
20
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
Daily Top 2Weekly Top 5

आनंदी मनाने परीक्षेला सामोरे जावा

By admin | Updated: February 20, 2017 00:19 IST

सुरेंद्र सिंग : ‘लोकमत’ व ‘महेश ट्युटोरियल लक्ष्य’तर्फे दहावी-बारावीच्या विद्यार्थी, पालकांसाठी सेमिनार

कोल्हापूर : दहावी-बारावीच्या मुलांनी वेळेचे योग्य नियोजन करून निकालाचे टेन्शन न घेता उरलेल्या दिवसांत अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे व आनंदी मनाने परीक्षेला जावे. त्यामुळे मनावरील दडपण कमी तर होईलच तर उज्ज्वल यशही मिळेल, असे प्रतिपादन ‘महेश ट्युटोरियल लक्ष्य’चे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख डॉ. सुरेंद्र सिंग यांनी शनिवारी केले. या कार्यक्रमाचे प्रायोजक रोबोमेट प्लस हे होते. यावेळी दहावी-बारावीचे विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. सिंग हे लोकमत व महेश ट्युरोरियल लक्ष्यतर्फे दहावी-बारावीच्या विद्यार्थी व पालकांसाठी केशवराव भोसले नाट्यगृहात आयोजित मार्गदर्शन सेमिनारमध्ये बोलत होते. ‘लोकमत’चे संस्थापक- संपादक स्वर्गीय जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमापूजनाने व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी ‘लोकमत’चे मनुष्यबळ व प्रशासन विभागाचे उपव्यवस्थापक संतोष साखरे, महेश ट्युटोरियल लक्ष्यचे प्रा. नरेश रेड्डी, संदीप गोसावी, संजय कुंभार, शंकर पणशीकर, कल्याणी साकलकल्ले, प्रा. विनोद पोरे, गजानन वेरुळकर, प्रीती पाटील उपस्थित होते.डॉ. सिंग म्हणाले, परीक्षा म्हटले की टेन्शन हे येतेच; परंतु त्याचा परिणाम आपल्या निकालावर होऊ शकतो. त्यामुळे शक्य तितके आनंदी राहून अभ्यासावर लक्ष केंद्रित करायला हवे. सुरुवातीलाच अभ्यासाचे आणि वेळेचे योग्य नियोजन करायला हवे. कोणत्या विषयाला, प्रकरणाला किती वेळ द्यावयाचा त्याचे अचूक नियोजन करून आत्तापासून अभ्यास करायला हवा. आत्मविश्वास वाढविण्यासाठी मागील परीक्षांचे पेपर सोडविणे फायदेशीर ठरते. संकटांना घाबरून पळ न काढता त्यांना आव्हान समजून मात करण्यासाठी सज्ज राहायला हवे. उरलेल्या दिवसाचे योग्य नियोजन करून टप्प्याटप्प्याने अभ्यास करा.विद्यार्थी व पालकांच्या नात्याविषयी बोलताना डॉ. सिंग म्हणाले, ‘पालकांनीही मुलांना समजून घ्यायला हवे. त्यांनी आत्मविश्वास कसा वाढेल, याकडे लक्ष द्यावे. त्यांच्यावर दडपण येईल असे वागू नये. आजूबाजूचे लोक काय म्हणतात याकडे लक्ष न देता आपल्या मुलांना आहे तसे स्वीकारा. त्यांचा क्षमता लक्षात घेऊन सकारात्मक विचार केल्यास अनेक प्रश्नांवर आपोआप उत्तरे मिळत जातील. मुलांनीही पालकांप्रती कृतज्ञतेचा दृष्टिकोन ठेवून वागावे. त्यांचा त्याग लक्षात घ्यावा. अभ्यास करणे ही आपली जबाबदारी आहे, हे लक्षात ठेवून अभ्यास करा. यशोशिखर गाठताना नकारात्मक गोष्टी सकारात्मकतेत कशा परावर्र्तित होतील, याकडे अधिक लक्ष द्यावे. परीक्षाकाळात आहारावर लक्ष द्यावे. आहारात घरगुती सात्त्विक जेवण व फळांचा समावेश असावा. दरम्यान, यावेळी रोबोमेट प्लस या सॉफ्टवेअरमुळे अभ्यासात कशी मदत होते याची माहिती व्हिडिओद्वारे दाखविण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांना मोफत रोबोमेट प्लस मार्गदर्शन व्याख्यान व बोर्डाच्या परीक्षेसाठी सराव प्रश्नपत्रिका देण्यात आल्या.‘लोकमत’चे वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख यांनी प्रास्ताविकात सेमिनारच्या आयोजनामागील उदेश सांगितला. विद्यार्थी हा घटक महत्त्वाचा असून, ’लोकमत’तर्फे दरवर्षी त्यांच्यासाठी मार्गदर्शनासह विविध उपक्रम आयोजित केले जातात. प्रिया दंडगे यांनी सूत्रसंचालन केले.