विमनस्क, विकलांगांना ‘शिवकुटी’चा आधार
By Admin | Updated: July 4, 2015 00:21 IST2015-07-04T00:20:01+5:302015-07-04T00:21:48+5:30
कोणी अन्न दिले तर ते खातात, अन्यथा ते तसेच पडून राहतात. विशेष म्हणजे पावसातही ते एकाच ठिकाणी बसून राहतात.

विमनस्क, विकलांगांना ‘शिवकुटी’चा आधार
कोल्हापूर : रंकाळा तलावाच्या फुलेवाडी रोडवर चार अनाथ विकलांग व विमनस्क अवस्थेत पावसामुळे अंगाचे मुटकुळे करून बसलेल्या येणाऱ्या-जाणाऱ्यांना दिसत होते. मात्र, त्यांना कोणी मदतीचा हात पुढे करीत नव्हते. ही बाब एस. पी. युवा सेनेच्या कार्यकर्त्यांना समजली. त्यांनी या चारजणांसाठी १८ बाय १० आकाराचा छोटासा निवारा डी. मार्टसमोरील रस्त्याच्या एका बाजूला शिवकुटी नावाचा निवारा उभा करीत शुक्रवारी दोघाजणांना हलविले. निराधार व अनाथ व्यक्तींचे ऊन, वारा, पाऊस यांपासून संरक्षण देण्याची व त्यासाठी आधार केंद्रे उभारण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने सर्व राज्यांना दिले आहेत. कोल्हापुरातही तसे ‘निवारा घर’ बांधले आहे; पण ते कोणालाही कोठे आहे हे माहीत नाही. रंकाळा तलावाच्या जवळपास तीन ते चारजण विकलांग व विमनस्क अवस्थेत फिरतात. कोणी अन्न दिले तर ते खातात, अन्यथा ते तसेच पडून राहतात. विशेष म्हणजे पावसातही ते एकाच ठिकाणी बसून राहतात. ही बाब संदीप काळे, परेश लाड, सागर कलघटगी, विराज ओतारी या युवकांना समजली. त्यांनी आपल्या एस. पी. गु्रपतर्फे रहदारीला अडथळा न करता आडोशाची जागा शोधली व २५ हजार रुपये खर्चून ‘शिवकुटी’ नावाचा तात्पुरता निवारा उभा केला. यात या चारजणांपैकी दोघाजणांना हलविले आहे. (प्रतिनिधी)