शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

कोल्हापुरातील स्वयंम् शाळेस हवाय दातृत्वाचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 12:42 AM

इंदुमती गणेश ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर गेलेल्या गतिमंद मुलांना शिक्षण देऊन त्यांना स्वयंनिर्भर करणाऱ्या स्वयंम् विशेष मुलांच्या शाळेला कोल्हापूरकरांच्या दातृत्वाचा आधार हवा आहे. सध्या शाळेत १४५ विशेष गतिमंद मुले शिक्षण घेत असून त्यांना अधिक सक्षम बनविण्यासाठी दत्तक पालक योजना सुरू करण्यात आली आहे. त्यात दानशूरांनी पुढाकार ...

इंदुमती गणेश ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर गेलेल्या गतिमंद मुलांना शिक्षण देऊन त्यांना स्वयंनिर्भर करणाऱ्या स्वयंम् विशेष मुलांच्या शाळेला कोल्हापूरकरांच्या दातृत्वाचा आधार हवा आहे. सध्या शाळेत १४५ विशेष गतिमंद मुले शिक्षण घेत असून त्यांना अधिक सक्षम बनविण्यासाठी दत्तक पालक योजना सुरू करण्यात आली आहे. त्यात दानशूरांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.कसबा बावड्यातील न्यायालयाच्या मागील बाजूस इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्यावतीने स्वयंम् विशेष गतिमंद मुलांची शाळा चालवली जाते. येथील मुलांचा विकास व्हावा, आर्थिकदृष्ट्या त्यांनी कुटुंबीयांना हातभार लावावा व स्वयंनिर्भर व्हावे यासाठी संस्था विशेष प्रयत्न करते. त्यातून ‘इको फ्रेंडली’ गणेशमूर्ती घडवणे, आकाशकंदील, पणत्या तयार करणे, फायली, पिशव्या तयार करणे अशा अनेक लघुउद्योगांचे प्रशिक्षण दिले जाते. त्यातून मिळणारे पैसे हे विद्यार्थ्यांनाच दिले जातात.या शाळेला शासनाच्यावतीने केवळ ४० विद्यार्थ्यांचा खर्च व चार कर्मचाºयांचा पगार दिला जातो त्यावरील १०४ विद्यार्थ्यांचा खर्च व अन्य ९ कर्मचाºयांचा पगार हा सोसायटीच्या पदाधिकाºयांच्या व दानशूरांच्या देणगीतून केला जातो. काही सक्षम पालक शक्य तितकी मदत करतात; पण बहुतांशी विद्यार्थी गरीब कुटुंबातील असून पालकांचे हातावरचे पोट आहे. दानशूर व पदाधिकाºयांच्या मदतीवर शाळेचा डोलारा सांभाळला जातोय. येथील व्यवस्था आणि विद्यार्थ्यांमध्ये होणारी प्रगती पाहून अनेक पालक आपल्या विशेष मुलांना या शाळेत घालत असल्याने दरवर्षी येथील विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे संस्थेच्या व्यवस्थापनाला शाळेचा खर्च भागवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. शाळेतील विद्यार्थ्यांना कोणत्याही गोष्टींची कमतरता भासू नये यासाठी व्यवस्थापन प्रयत्न करत आहे. मात्र, शासकीय निधीची आणि देणगीची मर्यादा पाहता खर्च भागवणे दिवसें-दिवस अवघड होत आहे.फक्त पाचहजारांची मदत...या योजनेअंतर्गत दानशूर व्यक्तीने एका वर्षासाठी किमान एका विद्यार्थ्याचे आर्थिक पालकत्व स्वीकारायचे आहे. त्यासाठी संस्थेकडे केवळ पाच हजारांची देणगी द्यायची आहे. शाळेला ‘८०-जी’ची मान्यता आहे. या पाच हजारांत निरागस मुलांची स्वयंनिर्भरतेची स्वप्ने पूर्ण होणार आहेत.येथे करा मदतआपल्या रकमेचा धनादेश इंडियन रेडक्रॉस सोसायटी, बँक आॅफ इंडिया, लक्ष्मीपुरी शााखा कोल्हापूर खाते क्रमांक : ०९००१०२००००३१८९, आयएफसीएस कोड नंबर - बीकेआयडी ००००९०० येथे जमा करू शकता. अधिक माहितीसाठी ०२३१-२६५०३६७, ९०११६५०३६७ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधता येईल.स्वयंम् शाळा गतिमंद मुलांना स्वावलंबी बनविण्याचे काम करते. मात्र, विद्यार्थीसंख्या जास्त असल्याने शाळेचा खर्च भागवणे अवघड होत आहे. दानशूर कोल्हापूरकरांनी केलेली छोटीशी मदत मुलांची स्वप्ने पूर्ण करण्यात मोलाचे योगदान ठरेल. - अमरदीप पाटील(उपाध्यक्ष, इंडियन रेडक्रॉस सोसायटी)