शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

अंबाबाई मंदिरातील बेसॉल्ट फरशी सुस्थितीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:27 IST

कोल्हापूर : करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील संगमरवरी फरशीखाली दडलेली बेसॉल्ट दगडी फरशी सुस्थितीत असल्याचा निर्वाळा मंगळवारी तज्ज्ञांनी दिला. त्यावरील ...

कोल्हापूर : करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील संगमरवरी फरशीखाली दडलेली बेसॉल्ट दगडी फरशी सुस्थितीत असल्याचा निर्वाळा मंगळवारी तज्ज्ञांनी दिला. त्यावरील संगमरवरी फरशी काढण्यासाठीचा प्रस्ताव देवस्थान समितीकडून हेरिटेज समितीला पाठविण्यात आला आहे. आज, बुधवारी होणाऱ्या बैठकीत यावर निर्णय घेतला जाईल.

अंबाबाई मंदिरातील पितळी उंबऱ्याबाहेर, कासव चौक व गणपती मंदिर चौकात संगमरवरी फरशी घालण्यात आली आहे. मंदिराचे मूळ स्वरूप उजेडात आणण्यासाठी ही फरशी काढण्याची शिफारस हेरिटेज समितीच्या अध्यक्षा अमरजा निंबाळकर यांनी देवस्थान समितीकडे केली होती. त्यानुसार मंगळवारी त्यांच्यासह देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडी यांच्या उपस्थितीत तज्ज्ञांमार्फत येथील कासव चौकातील दोन व सरस्वती मंदिर येथील एक अशा तीन ठिकाणच्या संगमरवरी फरशा काढण्यात आल्या. या सर्वच ठिकाणी मूळ बेसॉल्ट दगडी फरशी सुस्थितीत असल्याचे आढळले आहे. त्यामुळे वरील संगमरवरी फरशी काढून टाकण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी देवस्थान समितीने हेरिटेज समितीकडे केली आहे. आज, बुधवारी हेरिटेज समितीची बैठक होणार असून त्यात याबाबत निर्णय घेण्यात येईल.

--