बापूसाहेब पाटील सहकार समूह लोकांचा आधारवड : विश्वास पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:29 IST2021-08-24T04:29:48+5:302021-08-24T04:29:48+5:30

गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी बापूसाहेब यशवंत पाटील सहकार समूहातील बापूसाहेब पाटील दूध संस्था, अंबप विकास संस्था, सुरेश ...

Bapusaheb Patil Cooperative Group People's Support: Vishwas Patil | बापूसाहेब पाटील सहकार समूह लोकांचा आधारवड : विश्वास पाटील

बापूसाहेब पाटील सहकार समूह लोकांचा आधारवड : विश्वास पाटील

गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी बापूसाहेब यशवंत पाटील सहकार समूहातील बापूसाहेब पाटील दूध संस्था, अंबप विकास संस्था, सुरेश बापूसाहेब पाटील वाहनधारक पतसंस्था, विनय कोरे पाणी पुरवठा संस्थांना भेटी दिल्या. यावेळी ते बोलत होते.

बापूसाहेब पाटील दूध संस्थेचे अध्यक्ष ॲड. राजवर्धन पाटील, अंबप विकास संस्थेचे अध्यक्ष डॉ. बी. के. पाटील, सुरेश बापूसाहेब पाटील वाहनधारक पतसंस्थेचे अध्यक्ष सोमराज पाटील, विनयरावजी कोरे पाणी पुरवठा संस्थेचे अध्यक्ष सुदाम पाटील, माजी सरपंच संपत कांबळे, रामकृष्ण लोकरे, पंडित लोकरे, वसंतराव विभुते, समूहातील सर्व संचालक उपस्थित होते. संस्थेचे सचिव प्रदीप पाटील यांनी आभार मानले.

फोटो ओळी : अंबप (ता. हातकणंगले) येथील बापूसाहेब पाटील सहकार समूहास भेटीप्रसंगी गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील, सोबत बापूसाहेब पाटील सहकार समूहातील सर्व पदाधिकारी.

Web Title: Bapusaheb Patil Cooperative Group People's Support: Vishwas Patil