शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

बनावट सोने तारणावर बॅँकांची लुबाडणूक : जिल्हा बँक कसबा बीड, शिरोली दुमाला शाखेतही प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 01:10 IST

कोल्हापूर : बनावट सोने तारण देऊन त्यावर कर्जाची उचल कणारे आंतरराज्य सराफांचे रॅकेट उघडकीस आणण्यात मंगळवारी पोलिसांना यश आले. अडीच किलो बनावट सोन्यावर सुमारे लाखो रुपयांच्या कर्जाची उचल विविध बॅँकांकडून केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. यामध्ये जिल्हा बॅँकेच्या कसबा बीड व शिरोली दुमाला शाखेतही तीन प्रकरणे उघडकीस आली आहेत ...

ठळक मुद्दे सराफांचे रॅकेट ताब्यात या धक्कादायक प्रकाराने बॅँकिंग क्षेत्र हादरून गेले आहे.

कोल्हापूर : बनावट सोने तारण देऊन त्यावर कर्जाची उचल कणारे आंतरराज्य सराफांचे रॅकेट उघडकीस आणण्यात मंगळवारी पोलिसांना यश आले. अडीच किलो बनावट सोन्यावर सुमारे लाखो रुपयांच्या कर्जाची उचल विविध बॅँकांकडून केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. यामध्ये जिल्हा बॅँकेच्या कसबा बीड व शिरोली दुमाला शाखेतही तीन प्रकरणे उघडकीस आली आहेत व या बँकेच्या व्यवस्थापनाने त्यास दुजोरा दिला आहे. रॅकेट उघडकीस आल्याने जिल्ह्यातील बॅँकिंग क्षेत्रात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणात काही लोकांना ताब्यात घेतले आहे.

बनावट सोने तारण देऊन सराफ व काही बॅँकांचे अधिकारी संगनमताने बॅँकांची फसवणूक करीत असल्याचा संशय पोलिसांना होता. त्यानुसार गेले दोन दिवस करवीरचे पोलीस उपअधीक्षक सूरज गुरव यांनी काही सराफांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर कोणकोणत्या बॅँकांत बनावट सोने तारण दिले ते संबंधित सोनारांनी सांगितले. त्यानुसार पोलिसांनी संबंधित घटकांची कसून चौकशी सुरू केली आहे. करवीर तालुक्याच्या पश्चिमेकडील देवाच्या नावाने असलेल्या एका वाडीतील सोनारांचा समावेश असून पोलिसांच्या ‘प्रसादा’नंतर त्याने तोंड उघडले आहे.

त्यातील सोने परिसरातील काही लोकांना विकल्याचे उघड झाल्याने पोलिसांनी मंगळवारी संबंधितांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. हे सोने तारण देऊन संबंधितांनी जिल्हा बॅँकेच्या कसबा बीड शाखेतून दोघांनी, तर शिरोली दुमाला शाखेतून एकाने कर्ज उचल केल्याचे चौकशीत पुढे आल्याचे समजते. पोलिसांनी बॅँकेच्या अधिकाऱ्यांनाही चौकशीला बोलावले आहे. दरम्यान, जिल्हा बॅँकेच्या कसबा बावडा शाखेत बनावट सोने तारण प्रकरणानंतर सोनार पोलिसांच्या टेहळणीवर होते. त्यातूनच हे रॅकेट ताब्यात घेतले असून, या धक्कादायक प्रकाराने बॅँकिंग क्षेत्र हादरून गेले आहे.सोन्याचा मुलामा..बनावट दागिन्यांना सोन्याचा मुलामा दिल्याने सोने तपासण्याच्या मशीनमध्ये त्यातील बनावटगिरी उघडकीस येऊ शकली नसल्याचे बँकेच्या संबंधित सूत्रांचे म्हणणे आहे. कसबा बावडा शाखेत असाच प्रकार घडल्यानंतर जिल्हा बँकेने सराफाऐवजी सोन्याची शुद्धता तपासणारी मशिन्स घेतली तरीही अशी फसवणूक झाल्याने खळबळ उडाली. 

चोरीचे सोने तारण ठेवून आमच्या शाखांतून उचल केल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलीस त्या अनुषंगाने चौकशी करीत आहेत; पण ते सोने आम्ही मशीनद्वारे तपासूनच तारण घेतले.- डॉ. ए. बी. माने (मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा बॅँक)बनावट सोने तारण प्रकरणाबाबत काही सराफांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून चौकशी सुरू असून याबाबत आज, बुधवारी अधिकृत माहिती देऊ.- सूरज गुरव (पोलीस उपअधीक्षक, करवीर)

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसkolhapurकोल्हापूर