बँक ऑफ इंडियाचे कार्य कौतुकास्पद : मोहनलाल माळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:18 IST2021-01-08T05:18:49+5:302021-01-08T05:18:49+5:30

पेठवडगाव : बँक ऑफ इंडियाचे काम कौतुकास्पद असून, या ठिकाणी ग्राहकाला देण्यात येणाऱ्या सेवेमुळे सर्वांत जास्त खातेदार आहेत. मागेल ...

Bank of India's work is commendable: Mohanlal Mali | बँक ऑफ इंडियाचे कार्य कौतुकास्पद : मोहनलाल माळी

बँक ऑफ इंडियाचे कार्य कौतुकास्पद : मोहनलाल माळी

पेठवडगाव : बँक ऑफ इंडियाचे काम कौतुकास्पद असून, या ठिकाणी ग्राहकाला देण्यात येणाऱ्या सेवेमुळे सर्वांत जास्त खातेदार आहेत. मागेल त्याला कर्ज देण्याची या बँकेची भूमिका असल्यामुळे तिचे जाळे ग्रामीण भागासह शहरी भागामध्ये पसरलेले आहे. ही त्यांच्या कामाची पावती आहे, असे गौरवोद्गार नगराध्यक्ष मोहनलाल माळी यांनी काढले.

येथील बँक ऑफ शाखेच्या ४७ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी झोनल मॅनेजर हेमंत खेर होते. यावेळी दिलीप डिसले, बाळासाहेब खाडे, हर्षवर्धन चव्हाण, सूरज कुडाळकर, डॉ. स्मिता कुडाळकर, आदी उपस्थित होते. मुख्य प्रबंधक प्रदीप भुयान यांनी प्रास्ताविक केले. मीनाक्षी ठाकूर, प्रियांका भंडारे यांनी सूत्रसंचालन केले. विद्यासागर गायकवाड यांनी आभार मानले. यावेळी अबिनाश मोहंती, विनय शहा, मधुजा चिंगळे, सुहास शिर्के, दीपक पोळ, सचिन कुडाळकर, सुरेश माळी, गणेश पिसे, आदी उपस्थित होते.

फोटो - ०५०१२०२१-जेएवाय-०५

फोटो ओळ - पेठवडगाव येथे बँक ऑफ इंडिया शाखेच्या वर्धापनदिनानिमित्त नगराध्यक्ष मोहनलाल माळी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी हेमंत खेर, प्रदीप भुयान, आदी उपस्थित होते.

Web Title: Bank of India's work is commendable: Mohanlal Mali