शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधानांच्या सभेवेळी ड्रोन कॅमेऱ्यास बंदी, कोल्हापुरात सुरक्षा दलांसह दीड हजार पोलिस बंदोबस्त तैनात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2024 14:29 IST

अपर पोलिस महासंचालक सुखविंदर सिंग यांच्याकडून आढावा

कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचार सभा शनिवारी (दि. २७) तपोवन मैदानावर होणार असून, त्यासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. सुरक्षेच्या कारणामुळे सभेच्या ठिकाणी खासगी ड्रोन कॅमेरे उडवण्यास बंदी घालण्यात आली आहे. विविध सुरक्षा दलांसह दीड हजार पोलिस बंदोबस्तासाठी तैनात केले जाणार आहेत. राज्य गुप्त वार्ता विभागाचे अपर पोलिस महासंचालक सुखविंदर सिंग यांनी सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला असून, शुक्रवारी सुरक्षा यंत्रणांची प्रात्यक्षिके केली जाणार आहेत.महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा शनिवारी सायंकाळी तपोवन मैदानावर होणार आहे. मोदी यांच्यासोबत राज्यातील महायुतीचे नेतेही उपस्थित राहणार आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव विमानतळापासून ते तपोवन मैदानापर्यंत पोलिसांची करडी नजर राहणार आहे. यासाठी केंद्रीय राखीव सुरक्षा दलाच्या जवानांसह, राज्य राखीव पोलिस, जिल्हा पोलिस, होमगार्ड तैनात केले जाणार आहेत. अपर पोलिस महासंचालक सुखविंदर सिंग यांनी अलंकार हॉलमध्ये बंदोबस्ताचा आढावा घेऊन पोलिस अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. अधिकाऱ्यांनी विमानतळापासून तपोवनकडे पोहोचणारा मार्ग आणि तपोवन मैदानाची पाहणी केली. गुरुवारी रात्रीच बंदोबस्ताचे वाटप केले असून, महत्त्वाच्या ठिकाणी शुक्रवारी सायंकाळपासूनच बंदोबस्त तैनात होणार आहे. सुरक्षा यंत्रणांच्या तपासणीनंतरच नेते, कार्यकर्ते, प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी आणि सभेच्या येणाऱ्या नागरिकांना प्रवेश दिला जाईल, अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.हॉटेल, लॉजेसची तपासणीपंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यादरम्यान शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांकडून शहरातील हॉटेल, लॉजेस यांची तपासणी सुरू आहे. काही ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन राबवून संशयितांवर कारवाया केल्या जात आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरkolhapur-pcकोल्हापूरlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Narendra Modiनरेंद्र मोदीPoliceपोलिस