बळीराजाचा झेंडा छाताडावर ठेवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही :राजू शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 17:30 IST2020-12-08T15:49:06+5:302020-12-08T17:30:11+5:30

BharatBand, Farmer strike, Raju Shetty, kolhapur देशभरातील लोकांनी बंदमध्ये सहभागी होवून शेतकरी बांधवांच्या सोबत असल्याचे दाखवून दिले. यामुळे तीन कायदे रद्द करण्यासाठी बारा हत्तीचे बळ मिळाले आहे. बळीराजाचा झेंडा केद्र सरकारच्या छाताडावर ठेवल्याशिवाय आता स्वस्थ बसणार नाही, असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला.

Baliraja's flag will not be safe without putting it on the umbrella: Raju Shetty | बळीराजाचा झेंडा छाताडावर ठेवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही :राजू शेट्टी

बळीराजाचा झेंडा छाताडावर ठेवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही :राजू शेट्टी

ठळक मुद्दे बळीराजाचा झेंडा छाताड्यावर ठेवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही :राजू शेट्टी बिंदू चौकातील सत्यग्रह आंदोलन मोदी सरकारला इशारा : आरपारच्या लढाईचा निर्धार

कोल्हापूर : देशभरातील लोकांनी बंदमध्ये सहभागी होवून शेतकरी बांधवांच्या सोबत असल्याचे दाखवून दिले. यामुळे तीन कायदे रद्द करण्यासाठी बारा हत्तीचे बळ मिळाले आहे. बळीराजाचा झेंडा केद्र सरकारच्या छाताडावर ठेवल्याशिवाय आता स्वस्थ बसणार नाही, असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला.

अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्यावतीने मंगळवारी भारत बंदचे आवाहन केले होते. तसेच दिल्लीतील १३ दिवस सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठींबा म्हणून बिंदू चौक येथे पिठलं भाकरी व सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

बिंदू चौकामध्ये सर्वच पक्षातील, संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. सर्व समाज एका बाजूल असताना मुठभर व्यक्ती कायदाची अंमलबजावणी करणारच असे ठामपणे सांगत आहेत. त्यांना पुन्हा पेशवाई आणायची आहे काय. अशी स्वप्न पाहू नका, असे शेट्टी यांनी ठणकावून सांगितले.

चंद्रकांत पाटील यांना बिंदू चौकात येण्याचे खुले आव्हान

चंद्रकांत पाटील कायदाची अंमलबजावणी होणारच असे म्हणातात. तुम्ही कायदा वाचला आहे का. एकदा कायदा वाचा आणि काय अंमलबजावणी करणार हे आम्हालाही सांगा किंवा बिंदू चौकात सभा घेवून समोरासमोर चर्चेला या, असे आव्हान शेट्टी यांनी केले. 

Web Title: Baliraja's flag will not be safe without putting it on the umbrella: Raju Shetty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.