राष्ट्रीय दाढी मिशा स्पर्धेत बाळासाहेब तानवडेंचे यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:21 IST2020-12-24T04:21:19+5:302020-12-24T04:21:19+5:30
कोल्हापूर : जयपूर येथे झालेल्या मिस्टर इंडिया दाढी मिशी स्पर्धेत मुळचे कोल्हापुरातील आजरा तालुक्यातील देवर्डेचे रहिवासी असलेले मेकॅनिकल इंजिनिअर ...

राष्ट्रीय दाढी मिशा स्पर्धेत बाळासाहेब तानवडेंचे यश
कोल्हापूर : जयपूर येथे झालेल्या मिस्टर इंडिया दाढी मिशी स्पर्धेत मुळचे कोल्हापुरातील आजरा तालुक्यातील देवर्डेचे रहिवासी असलेले मेकॅनिकल इंजिनिअर व सध्या मुंबई येथे इन्स्टंट फुडचे व्यावसायिक असलेले बाळासाहेब तानवडे यांनी उत्कृष्ट मिशांबद्दल प्रथम क्रमांक पटकावला.
सध्या दाढी मिशा वाढविण्याकडे तरुणवर्गाचा कल वाढला आहे. अनेक चित्रपटांमधील नायक आणि विराट कोहलीसारखी दाढी वढविलेले अनेक तरूण सर्वत्र पाहायला मिळतात.
बीएफबी ग्रुपतर्फे १९ ते २० डिसेंबर दरम्यान जयपूर येथील हेवा हेवन या पंचतारांकीत हाॅटेलमध्ये आयोजित केलेल्या या स्पर्धेत देशभरातून हजारांहून अधिक स्पर्धकांनी प्रथम ऑनलाईन सहभाग घेतला. त्यातून निवडक पन्नास जणांची निवड अंतिम स्पर्धेसाठी झाली. या निवड झालेल्या स्पर्धकांमधून शारीरिक चाचणी, समूह संवाद, वैयक्तिक मुलाखत, रॅम्प वाॅक, अशा विविध चाचण्यांमधून तानवडे यांनी आपल्या व्यक्तिमत्वाची छाप परीक्षकांवर पाडली. सर्व कसोट्यांवर योग्य उतरल्यानंतर त्यांना विजेते घोषित करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते त्यांना चषक व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
फोटो : २३१२२०२०-कोल-बाळासाहेब तानवडे०१, ०२,
फोटो : २३१२२०२०-कोल-बाळासाहेब तानवडे०३
आेळी : जयपूूर (राजस्थान) येथे झालेल्या राष्ट्रीय दाढी मिशी स्पर्धेत उत्कृष्ट मिशा ठेवल्याबद्दल बाळासाहेब तानवडे यांना मान्यवरांच्या हस्ते चषक देऊन गाैरविण्यात आले.