शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला मजबूत पंतप्रधानांची गरज, नरेंद्र मोदी तर भाजपाचे प्रचारमंत्री; उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र
2
व्हाट्सअ‍ॅपच घोटाळेबाजांपासून सावध करणार, युजर्ससाठी दोन सेफ्टी टूल लाँच...; कशी वापरायची...
3
भारत अन् चीनचे जमायला लागले, तिकडे पाकिस्तान अस्वस्थ झाला, नवीन रडारड केली सुरू
4
"पुढच्या जन्मात मी तुलाच माझी पत्नी बनवेन"; काकीच्या प्रेमात वेडा झाला २६ वर्षीय तरुण अन्...
5
Mamata Banerjee : "मी जिवंत सिंहीण, जखमी करण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा...", ममता बॅनर्जींचं भाजपाला चॅलेंज
6
आता भारतातूनच खरेदी करा Apple, Microsoft चे शेअर्स! परदेशी गुंतवणुकीचा सोपा मार्ग, काय आहेत नियम व अटी?
7
“उपराष्ट्रपतींना तडकाफडकी राजीनामा का द्यावा लागला, आता आहेत तरी कुठे?” उद्धव ठाकरेंचा सवाल
8
तुम्ही जे पाहता ते 'स्क्रिप्टेड'! खुद्द क्रिकेटच्या देवानं शेअर केलं पंत संदर्भातील 'सीक्रेट'
9
प्रियकराच्या मदतीनं पतीला तडफडून मारले, आईचा कट लेकीनं केला उघड; पप्पाला कसं संपवलं, पोलिसांना सांगितले
10
"मोठी किंमत चुकवावी लागेल माहितीये, पण..."; पंतप्रधान मोदींचे डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बवर थेट उत्तर
11
विवेक सांगळेने लालबागमध्ये घेतलं नवीन घर, शेजारीच वडिलांची मिल; भावुक होत म्हणाला...
12
पतीला यमसदनी पाठवणाऱ्या सोनम रघुवंशीला बॉयफ्रेंडसोबत तुरुंगातून पडायचंय बाहेर; पण कोर्टानं सुनावला वेगळाच निर्णय!
13
उधमपूरमध्ये CRPF चे वाहन खोल दरीत कोसळले; दोन जवानांचा दुर्दैवी मृत्यू, १२ जखमी
14
Video: भाषिक वादावरून उद्धव ठाकरे दिल्लीत कडाडले; राज ठाकरेंसोबतच्या युतीवरही स्पष्टच बोलले
15
ट्रम्प टॅरिफमुळे 'या' क्षेत्राला होणार ₹२४,००० कोटींचं नुकसान; या कंपन्यांचे शेअर्स क्रॅश, तुमच्याकडे आहेत का?
16
'सुहागरात' झाली, नवऱ्याला खोलीत कोंडून बायको बाल्कनीत आली अन्...; स्टोरी ऐकून पोलिसही चक्रावले
17
चाळीशी ओलांडल्यावर 'या' गोष्टी सोडा, शंभर वर्षं जगाल; सांगताहेत तरुण सागर महाराज!
18
नवरा गंगास्नानासाठी गेला, बायकोने १५ लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारून बॉयफ्रेंडसह पळ काढला
19
ठरलेलं लग्न मोडलेला तरुण 'सैयारा' चित्रपट बघायला गेला, घरी परतला अन्...; संपूर्ण गावाला बसला मोठा धक्का!
20
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत वर्षाला फक्त १.५ लाख गुंतवून मिळवा ७० लाख रुपये, संपूर्ण रक्कम टॅक्स फ्री

गगनबावड्याच्या घाटात दडलाय बकासुराचा वाडा, ३५० फूट खोल दरीत हाय हा वाडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2022 11:33 IST

या गुहेचे अंतगृह वैशिष्ट्यपूर्ण आहे. आत शयनगृह, पाण्याचे कुंड आहे. १२ खांबांचे सभागृह आहे.

आदित्य वेल्हाळ

कोल्हापूर : कोल्हापूर व सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवर व समुद्रसपाटीपासून १५०० मीटर उंचीवर असलेली ऐनारी गुहा ही बकासुराचा वाडा म्हणून प्रचलित आहे. ऐनारी गावाच्या नावावरून या गुहेला ऐनारी नाव पडले असले तरी हाच तो बकासुराचा प्रदेश जेथे भीमाने बकासुराला मारले, असे लोककथांमध्ये सांगितले जाते. या गुहेच्या पायथ्याशी राकसवाडा आहे.

ही गुहा सह्याद्री पर्वतरांगांमध्ये झाकून गेली होती. ग्रामस्थांनी श्रमदानाने गुहेचे तोंड खुले केले. या गुहेपासून ४ किलोमीटरवर वेसरफ (ता. गगनबावडा) ची हद्द सुरू होते. गगनगड येथून ६ किलोमीटर अंतरावर आहे. सध्या या गुफांमधून प्राणी, वटवाघळांचा मुक्तसंचार आहे. या अपरिचित बकासुराच्या वाड्याची साहस मोहीम कोल्हापुरातील वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन रिसर्च सेंटरचे देवेंद्र भोसले व ऍडव्हेंचर गिअरचे गिर्यारोहक विनायक कालेकर यांनी रविवारी आयोजित केली होती.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यात भुईबावडापासून अगदीजवळ ही गुहा आहे. बकासुराचा या भागात संचार असायचा. त्याची स्मृती म्हणून दरवर्षी येथील शेतकरी प्रतीकात्मक बैल करून छोटीशी बैलगाडी जुंपतात त्यावर भाताच्या गोण्या व शिजविलेला भात ठेवतात व भात राकसवाडा जंगल परिसरात व गुहेच्या परिसरात ठेवला जातो.काही वर्षांपूर्वी भुईबावडा येथील शिक्षक पी. एन. बगाडे आपल्या सहकाऱ्यांसोबत या परिसरात भटकंती करत गेले होते. त्यांच्या समोर एक साळींदर या गुहेत शिरला. बगाडे व सहकारी त्याच्यामागून आत शिरले तर तिथे त्यांना हा वाडा दिसला. त्यावेळी या वाड्याची मोठी चर्चा झाली, अनेकांची उत्सुकता वाढली. ऐनारीची ही गुहा प्रसिद्धीला आली. अनेक इतिहास संशोधकांनी याची पाहणी केली. त्यांच्या मते ही गुहा सुमारे आठ हजार वर्षांपूर्वीची असावी, असा कयास आहे.

अशी आहे गुहा

या गुहेचे अंतगृह वैशिष्ट्यपूर्ण आहे. आत शयनगृह, पाण्याचे कुंड आहे. १२ खांबांचे सभागृह आहे. यातील सहा खांबांची पडझड झाली आहे. प्रत्येक खांब १२ ते १४ फूट उंचीचा व दाेन खांबांत १० फुटांचे अंतर आहे. गुहेपासून २० फुटांवर विहीर आहे, जी आता मुजली आहे.

बकासुराच्या वाड्याला कसे जावे..?

वेसरफ (ता. गगनबावडा) मार्गे चालत अनुभवी गिर्यारोहक व ट्रेकर्सच्या माध्यमातून रोपच्या साह्याने दरीतून जावे लागते. मुंबई-गोवा महामार्गावरून भुईबावडा घाटातून ४ किलोमीटरवर ऐनारी गाव आहे. या गावातून ऐनारी गुहेकडे १५०० मीटर उंचीवरील पायवाट बिकट आहे. पण गावकऱ्यांच्या मदतीने येथे जाता येते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर