शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

जिल्हा परिषदेत सत्तांतर, अध्यक्षपदी काँग्रेसचे बजरंग पाटील, उपाध्यक्षपदी सतीश पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 15:40 IST

कोल्हापूर जिल्हा परिषदेत सत्तांतर झाले असून अध्यक्षपदी अखेर अपेक्षेप्रमाणे काँग्रेसचे गगनबावडा तालुक्यातील सदस्य बजरंग पाटील यांची तर राष्ट्रवादीचे सतीश पाटील यांची उपाध्यक्षपदी आज, गुरुवारी निवड झाली. शिवसेनेच्या सदस्यांनी दोन्ही काँग्रेसला पाठिंबा दिल्याने जिल्हा परिषदेतही महाविकास आघाडी सत्तेत आली आहे. राज्यातील महाविकास आघाडी पॅटर्न कोल्हापुरातही यशस्वी झाला. जिल्हापरिषेवर ३ वर्षांनी पुन्हा एकदा काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा झेंडा फडकला. 

ठळक मुद्देजिल्हा परिषदेत सत्तांतर, अध्यक्षपदी काँग्रेसचे बजरंग पाटीलशिवसेनेच्या सदस्यांचा दोन्ही काँग्रेसला पाठिंबा

कोल्हापूर : जिल्हा परिषदेत सत्तांतर झाले असून अध्यक्षपदी अखेर अपेक्षेप्रमाणे काँग्रेसचे गगनबावडा तालुक्यातील सदस्य बजरंग पाटील यांची तर राष्ट्रवादीचे सतीश पाटील यांची उपाध्यक्षपदी आज, गुरुवारी निवड झाली. शिवसेनेच्या सदस्यांनी दोन्ही काँग्रेसला पाठिंबा दिल्याने जिल्हा परिषदेतही महाविकास आघाडी सत्तेत आली आहे. राज्यातील महाविकास आघाडी पॅटर्न कोल्हापुरातही यशस्वी झाला. जिल्हापरिषेवर ३ वर्षांनी पुन्हा एकदा काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा झेंडा फडकला. 

बेळगाव येथे बुधवारी झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीस बहुमतासाठी लागणारे ३४ सदस्य उपस्थित होते, आणि शिवसेनेने काँग्रेस महाआघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेतला, तेव्हाच आघाडी सत्तेत येणार हे निश्चित झाले होते. बजरंग पाटील हे मंत्री सतेज पाटील यांचे समर्थक आहेत.जिल्हा परिषदेच्या राजर्षी शाहू सभागृहामध्ये आज, गुरुवारी सकाळी ११ वाजल्यापासून ही निवडप्रक्रिया सुरू झाली. करवीरचे प्रांताधिकारी वैभव नावडकर हे पीठासन अधिकारी होते. सकाळी ११ ते एक वाजेपर्यंत अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदांसाठी अर्ज दाखल करण्यात आले. यानंतर २ वाजता सभेच्या प्रारंभी आलेल्या नामनिर्देशन पत्रांची छाननी करण्यात आली. त्यानंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी १५ मिनिटांचा वेळ देण्यात आला. त्यानंतर मतदान घेण्यात आले.महाआघाडीचे उमेदवार बजरंग ज्ञानू पाटील उर्फ तात्या १७ मतांनी विजयी झाले. त्यांना ४१ मते मिळाली. तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे सतीश पाटील विजयी  झाले.  भाजप आघाडीचे उमेदवार अरुण इंगवले यांना अवघी २४ मते मिळाली. भाजपच्या विजय भोजे यांनी मतदान केले नाही तर राष्ट्रवादीचे जीवन पाटील गैरहजर राहिले.  रेश्मा देसाई यांनी महाविकास आघाडीला मतदान केले, तर अंबरीश घाटगे यांनी भाजप विरोधात मतदान केले. राहुल पाटील अध्यक्ष पदाचे सूचक तर उमेश आपटे उपाध्यक्षपदाचे सूचक होते. आमदार पी.एन.पाटील यांचे जिल्हा परिषदेतील समर्थक चार सदस्य काँग्रेससोबतच राहिले. त्यांना आमदार पाटील यांनी मंगळवारी माघारी बोलवून घेउन समजूत काढली होती.

बजरंग तात्या झेडपीत आल्यानंतर भावुक झाले, त्यांना अश्रू अनावर झाले, हे आनंदाचे अश्रू आहेत असे डोळे पुसतच म्हणाले.जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुक २०२०पक्षीय बलाबल

  • कॉग्रेस -१४
  • राष्ट्रवादी -१०
  • शिवसेना -१०
  • शेतकरी संघटना -०२
  • शाहू आघाडी _ ०२
  • अपक्ष -०१
  • चंदगड विकास आघाडी- ०१
  • ताराराणी आघाडी - ०१

एकूण -४१__भाजप आघाडी

  • भाजप -१३
  • आवाडे गट -०२
  • चंदगड युवक क्रांती आघाडी- ०१
  • जनसुराज्य - ०६
  • ताराराणी आघाडी ०२

एकूण -२४

 

टॅग्स :zpजिल्हा परिषदkolhapurकोल्हापूरcongressकाँग्रेस