मागास कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नी लक्ष घालणार : चोकलिंगम्
By Admin | Updated: January 19, 2015 00:50 IST2015-01-19T00:40:36+5:302015-01-19T00:50:24+5:30
सेवा भरतीतील पदोन्नतीतील आरक्षण तत्काळ भरून काढण्याची अन्यायग्रस्त प्रकरणे निकाली काढण्याबाबत सकारात्मक चर्चा

मागास कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नी लक्ष घालणार : चोकलिंगम्
कोल्हापूर : सरळ सेवा भरतीमधील आरक्षण पदोन्नतीमधील आरक्षण तत्काळ भरून काढण्याबाबत मागास कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांमध्ये लक्ष घालू, असे आश्वासन पुणे विभागीय आयुक्त चोकलिंगम् यांनी येथे दिले.राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ, पुणेतर्फे राज्याचे मुख्य संघटक सचिव राजेंद्र कांबळे, उपाध्यक्ष प्राचार्य म. ना. कांबळे, महासचिव विलास बोर्डे, कार्याध्यक्ष मच्छिंद्रनाथ शेंडगे, किशोर कांबळे यांच्या उपस्थितीत पुणे महसूल आयुक्तालयात संघटनेतर्फे चोकलिंगम् यांचे स्वागत केले. सरळ सेवा भरतीतील पदोन्नतीतील आरक्षण तत्काळ भरून काढण्याची अन्यायग्रस्त प्रकरणे निकाली काढण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. (प्रतिनिधी)