शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

'उद्याचा बंद मागे, पण काळ्या फिती बांधून निषेध नोंदवणार'; जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2024 23:07 IST

महाविकास आघाडीतील सर्वच नेते त्यांच्या शहरात बसणार आहेत. बंद मागे घेण्यात आला आहे, असंही जयंत पाटील म्हणाले. 

Jayant Patil ( Marathi News) : बदलापूर शहरातील एका शाळेत दोन लहान मुलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणाच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने उद्या महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. मात्र या बंदविरोधात वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती. या याचिकेवर झालेल्या सुनावणीवेळी मुंबई हायकोर्टाने सदर बंद बेकायदेशीर असल्याचं म्हटलं आहे. राजकीय पक्षांना बंद पुकारण्याचा अधिकार नसून जे लोक बंद पुकारतील त्यांच्याविरोधात कारवाई करा, असे आदेश कोर्टाकडून देण्यात आले आहेत.  यामुळे आता महाविकास आघाडीने हा बंद मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. पण, उद्या सकाळी दहा वाजता काळ्या फिती बांधून निषेध नोंदवणार असल्याची माहिती 'राष्ट्रवादी शरदचंद्र पवार' पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली.

उद्याचा 'मविआ'चा बंद हायकोर्टाने बेकायदा ठरवला, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले, "आम्ही कोर्टाचा..."

"महाविकास आघाडीने बदलापूरला जी घटना घडली त्याचा निषेध म्हणून बंदचा नारा दिला होता. पण, काही लोक कोर्टात गेली. कोर्टाने निर्णय दिला. कोर्टाचा आदर राखून महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीने बंद करणे रद्द केला आहे. पण बदलापूर घटनेचा निषेध म्हणून राज्यभर उद्या सकाळी १० वाजता महाविकास आघाडीचे नेते आप आपल्या शहरात एक तास काळ्या फिती बांधून निषेध नोंदवणार आहेत, असंही जयंत पाटील यांनी सांगितले.

"न्यायालयाच्या निर्णयावर आम्हाला कोणतही भाष्य करायचं नाही. बदलापूरची घटना सामान्य माणसांच्या जीवाला लागली आहे. कायदा व सुव्यवस्थेतील वारंवार दिसत आहे. राज्यात अशा घटना सारख्या दिसत आहे. बदलापूर आणि राज्यातील घटनांचा निषध म्हणून महाराष्ट्रात निषेध म्हणून नोंदवण्यात येणार आहे.महाविकास आघाडीतील सर्वच नेते त्यांच्या शहरात बसणार आहेत. बंद मागे घेण्यात आला आहे, असंही जयंत पाटील म्हणाले. 

जयंत पाटील म्हणाले, राज्यातील सर्वच घटनांचा निषेध नोंदवण्यात येणार आहे. आरक्षणाच्या बाबतीत जे कोर्टात गेले, अनेक बाबीत कोर्टात जाण्याच काम ज्यांच्याकडे सोपवलं जातं. त्यांच्याकडेच आता हे काम सोपवलं होतं. पण, कोर्टाच्या निर्णयाचा आम्ही अवमान करणार नाही. आंम्ही बंद मागे घेतला, असंही जयंत पाटील म्हणाले. 

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेस