शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची मागणी शरद पवारांनी केली मान्य; म्हणाले,"...त्यासाठी तुमच्या सगळ्यांची तयारी पाहिजे"
2
शरद पवारांना मोठा धक्का; इथे वर्धापनदिनाचा कार्यक्रम, तिथे २ बड्या नेत्यांचा भाजपा प्रवेश
3
जयंत पाटील बाहेर पडणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘पत्रही नाही, राजीनामाही नाही…’
4
"माझ्या मुलाला न्याय हवाय, सोनमच्या खात्यात २० लाख..."; राजाच्या आईने केली सुनेची पोलखोल
5
Sonam Raghuvanshi : ज्या गाईडला दिला नकार, तोच बनला मोठा साक्षीदार! सोनमचं पितळ उघडं कसं पडलं?
6
दिल्लीत एका फ्लॅटला भीषण आग, जीव वाचवण्यासाठी वडिलांची दोन मुलांसह इमारतीवरून उडी, तिघांचाही मृत्यू
7
“चुकीच्या मार्गाला सुप्रिया सुळे जातील असे वाटत नाही”; संजय राऊत आशावादी, भाजपावर टीका
8
गोल्ड लोन घेताय? थांबा! RBI च्या 'या' नवीन नियमांचा तुम्हाला फायदा होणार की तोटा? वाचा सविस्तर
9
COVID19: कोरोनाचा विळखा घट्ट होतोय; राज्यातील रुग्णांचा आकडा १३०० पार!
10
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
11
...म्हणून सोनमचा प्रियकर स्वत: शिलाँगला गेला नव्हता, राजाचा काटा काढण्यासाठी असा रचला भयानक कट  
12
MBA चं स्वप्न मोडलं, घराबाहेर जाण्यावर लावली बंदी; सोनम रघुवंशीची अशी होती 'सीक्रेट लाइफ'
13
वारंवार घरातून पळून जात होती पत्नी; वैतागलेल्या पतीनं उचललं धक्कादायक पाऊल!
14
Raja Raghuvanshi Murder Case : पती राजाची 'सुपारी' देणारी सोनम रघुवंशी गर्भवती आहे का? तिची प्रेग्नंसी टेस्ट झाली अन्...
15
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
16
रेश्मा शिंदेने घरातच साजरी केली वटपौर्णिमा! अभिनेत्रीसोबत साऊथ पतीनेही वडाच्या झाडाला मारल्या फेऱ्या
17
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
18
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
19
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
20
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!

राष्ट्रवादी अजितदादा गटाच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, ए. वाय. पाटीलांना केलं बाजूला

By राजाराम लोंढे | Updated: January 24, 2024 17:05 IST

कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या  कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर यांची निवड बुधवारी करण्यात आली. पक्षाचे राष्ट्रीय ...

कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर यांची निवड बुधवारी करण्यात आली. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना नियुक्तीचे पत्र दिले. ‘बिद्री’साखर कारखान्याच्या निवडणुकीपासून ए. वाय. पाटील नाराज होते, ते पक्षात सक्रीय नसल्याने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले.गेली दहा वर्षे ए. वाय. पाटील यांनी जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली होती. पण, गेल्या तीन-चार महिन्यापासून ते पक्षात फारसे सक्रीय नव्हते. त्यामुळे बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर यांच्यावर पक्षाने जबाबदारी सोपवली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना नियुक्तीचे पत्र दिले. यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार राजेश पाटील, शाहूवाडी विधानसभेचे अध्यक्ष संतोष धुमाळ आदी उपस्थित होते.

पक्षश्रेष्ठींनी दिलेली जबाबदारी अतिशय प्रामाणिकपणे पार पाडत असताना जिल्ह्यात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली व पक्षाच्या सर्व नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नंबर वन करु. -बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवार