शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

'तिरुपती'मध्ये कोल्हापूर भवन, प्रस्ताव देण्याचे नायडू यांचे आवाहन; अंबाबाईला अर्पण केलेल्या साडीची किंमत १ लाख ६६ हजार रुपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 16:14 IST

आदिशक्ती अंबाबाईला दरवर्षी नवरात्र उत्सवात तिरुमला तिरुपती देवस्थानकडून मानाचे महावस्त्र साडी अर्पण केली जाते

कोल्हापूर : तिरुमला तिरुपती देवस्थान येथे कोल्हापूर भवन उभारण्यासाठीचा प्रस्ताव महिनाभरात द्या, तिरुमला देवस्थान समितीच्या बैठकीत यावर चर्चा करून सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन तिरुपती देवस्थानचे चेअरमन बी.आर. नायडू यांनी सोमवारी दिले. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने यापूर्वी दोन वेळा दिलेल्या प्रस्तावांची माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्यानंतर त्यांनी ही ग्वाही दिली.आदिशक्ती अंबाबाईच्या कृपाशीर्वादामुळे तिरुमला येथे भगवान विष्णू व पत्नी लक्ष्मी यांची भेट झाली. त्यानंतर येथे श्री बालाजी रुपात श्री विष्णूंचे अवतारकार्य झाले. त्यानिमित्त आदिशक्ती अंबाबाईला दरवर्षी नवरात्र उत्सवात तिरुमला तिरुपती देवस्थानकडून मानाचे महावस्त्र साडी अर्पण केली जाते. त्यासाठी चेअरमन बी.आर. नायडू यांच्यासह पदाधिकारी कोल्हापुरात आले होते. अंबाबाईला महावस्त्र अर्पण केल्यानंतर जिल्हाधिकारी अमोल येडगे व सचिव शिवराज नाईकवाडे यांनी तिरुपती येथे कोल्हापूर भवन उभारण्यासाठी यापूर्वी दोन वेळा पाठवलेल्या प्रस्तावांची माहिती दिली.पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने तिरुपती देवस्थानकडे कोल्हापूर भवन उभारण्यासाठी तिरुपती देवस्थानकडे १ एकर जागेची मागणी केली आहे. त्यासाठीचे प्रस्ताव २०२२ व सन २०२३ साली असे दोन वेळा पाठवले आहेत. मात्र अजून तिरुपती देवस्थानकडून सकारात्मक निर्णय आलेला नाही. यापूर्वी तिरुपती देवस्थानने देशभरातील प्रमुख मंदिर व मठांना त्यांचे भवन बांधण्यासाठी जागा दिली आहे.तिरुपतीला जाऊन आल्यावर अंबाबाईचे दर्शन घेण्याची पद्धत आहे. त्यासाठी थेट रेल्वे सोडली जाते. एवढे अंबाबाईचे महत्त्व असताना तिथे कोल्हापूर भवन नाही, ही बाब तिरुपती देवस्थानच्या निदर्शनास आणून देण्यात आली. यावर देवस्थानचे चेअरमन बी.आर. नायडू यांनी महिनाभरात प्रस्ताव घेऊन या, देवस्थानच्या बैठकीत यावर चर्चा केली जाईल, असे सांगितले.

पिस्ता रंग, गुलाबी काठाची साडीतिरूमला तिरूपती देवस्थानकडून करवीर निवासिनी श्री अंबाबाईला मानाची साडी अर्पण करण्यात आली. पिस्ता रंग व गुलाबी काठाच्या या साडीची किंमत १ लाख ६६ हजार १०० रुपये आहे. चेअरमन बी. आर. नायडू यांच्या हस्ते जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी साडी स्वीकारली.यावेळी तिरुमला देवस्थानचे व्ही. प्रभाकर रेड्डी, आमदार व्ही प्रशांती रेड्डी, भानुप्रकाश रेड्डी, सौरभ व्होरा, डॉलर दिवाकर रेड्डी, व्ही, शांताराम, मोहन राव, के. रामाराव, खासदार श्रीकांत शिंदे, धैर्यशील माने, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, देवस्थानचे सचिव शिवराज नाईकवाडे, व्यवस्थापक महादेव दिंडे, वेदांतिका माने उपस्थित होत्या.