भारतीय संविधानाबाबत जनजागरण आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:12 IST2021-02-05T07:12:21+5:302021-02-05T07:12:21+5:30
कोल्हापूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानुसार आपल्या देशाचा कारभार सुरू आहे. या संविधानाबाबत जनजागरण करणे आवश्यक ...

भारतीय संविधानाबाबत जनजागरण आवश्यक
कोल्हापूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानुसार आपल्या देशाचा कारभार सुरू आहे. या संविधानाबाबत जनजागरण करणे आवश्यक आहे, असे मत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी व्यक्त केले.
जिल्हा परिषदेमध्ये मंगळवारी अध्यक्ष बजरंग पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी संविधानातील उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. कार्यक्रमाला उपाध्यक्ष सतीश पाटील, सभापती प्रवीण यादव, डॉ. पद्माराणी पाटील, स्वाती सासने, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने, प्रकल्प संचालक डॉ. रवी शिवदास यांच्यासह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.
२७०१२०२१ कोल झेडपी ०१
कोल्हापूर जिल्हा परिषदेत अध्यक्ष बजरंग पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी ध्वजारोहण करण्यात आले.