शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
3
'मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली'; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
4
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
5
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
6
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
7
Sara Tendulkar : सारा तेंडुलकर आता कोरियन ब्युटी ब्रँडची ॲम्बेसेडर; कोणत्या प्रोडक्टची करणार जाहिरात?
8
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
9
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
10
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
11
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
12
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
13
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
14
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
15
अमेठीत २५ वर्षांत प्रथमच मैदानात नसेल गांधी घराणे; बालेकिल्ल्यातून काॅंग्रेसने उमेदवार बदलला, भाजप नेत्यांचे टीकास्त्र
16
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
17
Akshaya Tritiya 2024: चैत्रगौरीला निरोप देताना कुंकवाची पावलं काढा आणि 'पुनरागमनायच' म्हणा; कारण...
18
खासदारांना डावलून आमदार रिंगणात, नव्या चेहऱ्यांमुळे चुरस; रणनीती ठरणार का यशस्वी?
19
'ही' साऊथ अभिनेत्री, जी प्रेमासाठी बनली वयानं २७ वर्ष मोठ्या असलेल्या माजी CM ची दुसरी पत्नी
20
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल

गिरिजा, स्वप्निल, वैष्णवी यांना पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2020 7:25 PM

राष्ट्रीय सबज्युनिअर स्पर्धेतही द्वितीय, तृतीय असा क्रमांक पटकावून संघाच्या कामगिरीत मोलाची मदत केली. इंदोर येथे झालेल्या आंतरविद्यापीठ स्पर्धेतही शिवाजी विद्यापीठाच्या बेसबॉल संघाकडून खेळताना ती चमकली आहे. अनेक स्पर्धेतील चमक दार कामगिरीची दखल घेत क्रीडा खात्याने तिला २०१८-१९ चा बेसबॉलसाठी हा पुरस्कार जाहीर केला आहे.

ठळक मुद्दे शिवछत्रपती पुरस्कार : मार्गदर्शक अनिल पोवार यांचाही समावेश, कोल्हापूरचा सन्मान

कोल्हापूर : कोल्हापूरची गिरिजा सुनील बोडेकर (बेसबॉल), स्वप्निल संजय पाटील (दिव्यांग जलतरणपटू), वैष्णवी सुतार (दिव्यांग टेबल टेनिसपटू) या तिघांना उत्कृष्ट खेळाडू; तर अनिल बंडो पोवार यांचा उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक शिवछत्रपती पुरस्कार मंगळवारी जाहीर झाला. राज्याच्या क्रीडा व युवा सेवा संचालनालयातर्फे २०१८-१९ या सालातील या पुरस्कारांची घोषणा झाली. या पुरस्कारांचे वितरण मुंबईत गेट वे आॅफ इंडियाला शनिवारी (दि. २२) सायंकाळी पाच वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. खेलो इंडिया स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्यास एक लाख, तर रौप्यपदक विजेत्यास ७५ हजार व कांस्यपदक विजेत्यास ५० हजार रुपयांचे धनादेश देऊन सत्कार केला जाणार आहे.

शिवछत्रपती पुरस्कार विजेत्यास रोख एक लाख रुपये, ब्लेझर, सन्मान चिन्ह दिले जाते. कदमवाडीत राहणारी गिरिजा बोडेकर हिने २०१६ मध्ये दक्षिण कोरिया येथे झालेल्या विश्वचषक बेसबॉल स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. ‘बीएफए’तर्फे हॉँगकाँग येथे झालेल्या महिलांच्या आशियाई बेसबॉल स्पर्धेतही तिने भारतीय संघातून प्रतिनिधित्व करीत उत्कृष्ट कामगिरी केली. तिने छत्तीसगढ येथे डिसेंबर २०१३ मध्ये झालेल्या राष्ट्रीय शालेय बेसबॉल स्पर्धेत सांघिकमध्ये तृतीय, त्यानंतर दुसऱ्या वर्षी सांघिकमध्ये द्वितीय, तर २०१५ मध्ये तृतीय क्रमांक पटकाविला. राष्ट्रीय सबज्युनिअर स्पर्धेतही द्वितीय, तृतीय असा क्रमांक पटकावून संघाच्या कामगिरीत मोलाची मदत केली. इंदोर येथे झालेल्या आंतरविद्यापीठ स्पर्धेतही शिवाजी विद्यापीठाच्या बेसबॉल संघाकडून खेळताना ती चमकली आहे. अनेक स्पर्धेतील चमक दार कामगिरीची दखल घेत क्रीडा खात्याने तिला २०१८-१९ चा बेसबॉलसाठी हा पुरस्कार जाहीर केला आहे.

  • रविवार पेठेत राहणा-या दिव्यांग टेबल टेनिसपटू वैष्णवी सुतार यांनी आतापर्यंत १५ आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेत दोन कांस्य, सात राष्ट्रीय स्पर्धांत चार सुवर्ण आणि दोन रौप्यपदकांची कमाई केली आहे. अशी कामगिरी करणाºया त्या पहिल्या दिव्यांग महाराष्ट्रीय टेबल टेनिसपटू ठरल्या आहेत. त्यांचे टेबल टेनिसमधील आंतरराष्ट्रीय मानांकन २१, तर आशियाई मानांकनात १० वा क्रमांक आहे. त्या २०११ पासून पॅरा टेबल टेनिस हा खेळ खेळत आहेत. आतापर्यंत त्यांनी ३१ राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेतला आहे. तीन राज्यस्तरीय स्पर्धांतही त्यांनी दोन सुवर्ण, तर एका रौप्यपदकाची कमाई केली. विशेष म्हणजे त्या मस्क्युलर डिस्ट्रॉफी या आजाराने ग्रस्त आहेत. अशा परिस्थितीतही त्या रोज दोन तास सराव करीत आहेत. त्या २०२० मध्ये जपान येथे होणा-या पॅराआॅलिम्पिक स्पर्धेसाठी तयारी करीत आहेत.

 

 

  • शास्त्रीनगर येथे राहणारा दिव्यांग स्वप्निल पाटील याने २००७ पासून प्रथम पीजीटी आणि त्यानंतर अंबाई जलतरण तलाव येथे सरावास सुरुवात केली. जिल्हा आणि राज्यस्तरीय शालेय स्पर्धेत उत्तुंग कामगिरी केलीे. दिव्यांगांच्या स्पर्धेत सहभाग घेता घेता त्यांने नियमित स्पर्धेतही चांगले यश मिळविले. २०१४ मध्ये दक्षिण कोरिया येथे झालेल्या पॅरा एशियन जलतरण स्पर्धेत त्याने बेस्ट स्ट्रोक, फ्रीस्टाईल आणि १०० मीटर फ्रीस्टाईलमध्ये कांस्यपदकाची कमाई केली. जकार्ता येथे झालेल्या पॅराएशियन जलतरण स्पर्धेत १०० मीटर बॅकस्ट्रोकमध्ये रौप्य, ४०० मीटर फ्रीस्टाईल व १०० मीटर फ्रीस्टाईलमध्ये प्रत्येकी एका कास्यपदकाची कमाई केली. या कामगिरीवर त्याची आयवा (आॅस्ट्रेलिया) येथे विश्वचषक पॅरा जलतरण स्पर्धेसाठी २०१९ मध्ये निवड झाली. त्यातही त्याने दोन सुवर्ण, तर तीन रौप्य व एका कांस्यपदकाची कमाई केली. या उत्तुंग यशाची दखल सरकारने घेतली.

मार्गदर्शकाचा सन्मानउचगाव (ता. करवीर) येथे राहणारे अनिल पोवार यांना यापूर्वी २०१४-१५ साली शिवछत्रपती (एकलव्य राज्य क्रीडा पुरस्कार) दिव्यांग मैदानी व क्रिकेट, आदी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील कामगिरीबद्दल मिळाला आहे. यंदाचा २०१८-१९ चा शिवछत्रपती दुसऱ्यांदा (उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक दिव्यांग) जाहीर झाला. अनेक दिव्यांग खेळाडूंनाही त्यांनी मार्गदर्शन केले आहे. जिल्ह्यातील अनेक दिव्यांग खेळाडूंना गेल्या २० वर्षांत प्रोत्साहन देऊन राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरांवर पोहोचविण्यास साहाय्य केले आहे. 

 

दुस-यांदा मिळणारा शिवछत्रपती पुरस्कार हा माझा एकट्याचा नसून आजवर निर्माण झालेल्या सर्व दिव्यांग खेळाडूंचा आहे. या पुरस्कारामुळे दिव्यांग खेळांना आणखी बळकटी मिळेल.- अनिल पोवार

 

माझ्या वडिलांनी मला प्रथम हौसेखातर जलतरण तलावात पोहण्यासाठी पाठविले. त्यानंतर मला गोडी निर्माण झाली. यात मला राजाराम घाग सरांनी उत्कृष्टरीत्या जलतरणपटू म्हणून घडविले. माझ्या या यशात आईवडिलांसह सर्व मार्गदर्शकांचा मोलाचा वाटा आहे.- स्वप्निल पाटील

 

दुर्दम्य आजारासह मी या खेळाचा सराव करीत आहे. यात यश-अपयशाचा विचार कधी केला नाही. सराव करीत गेलो आणि यश मिळत गेले. मी सध्या २०२० टोकियो पॅराआॅलिम्पिकची तयारी करीत आहे. माझ्या यशात माजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह के.एस.ए.चे संग्राम सरांचे मोलाचे मार्गदर्शन ठरले.- वैष्णवी सुतार

 

मी पाचवीला असताना मला बेसबॉल हा खेळ माहीत नव्हता. शां. कृ. पंत वालावलकर हायस्कूलचे क्रीडाशिक्षक राजेंद्र बनसोडे यांनी खेळासाठी निवड केली. त्याचे परिपूर्ण ज्ञान आणि मार्गदर्शन केले. यासोबतच आई-वडील आणि राज्य बेसबॉल असोसिएशनचे सचिव राजेंद्र इखनकर यांच्या बहुमोल मार्गदर्शनामुळेच हा पुरस्कार प्राप्त झाला.- गिरिजा बोडेकर

टॅग्स :kolhapurकोल्हापूर