सांगरूळ शिक्षणसंस्थेचे अध्यक्ष यशवंतराव खाडे यांना पुरस्कार जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:22 IST2021-03-25T04:22:23+5:302021-03-25T04:22:23+5:30

कर्नाटक, गोवा आणि महाराष्ट्र या तीन राज्यांतील शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांची निवड या पुरस्कारासाठी करण्यात येते. विशेष शैक्षणिक व सामाजिक ...

Award announced to Yashwantrao Khade, President of Sangrul Educational Institution | सांगरूळ शिक्षणसंस्थेचे अध्यक्ष यशवंतराव खाडे यांना पुरस्कार जाहीर

सांगरूळ शिक्षणसंस्थेचे अध्यक्ष यशवंतराव खाडे यांना पुरस्कार जाहीर

कर्नाटक, गोवा आणि महाराष्ट्र या तीन राज्यांतील शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांची निवड या पुरस्कारासाठी करण्यात येते. विशेष शैक्षणिक व सामाजिक सेवा संवर्गातील पुरस्कार त्यांच्या कामाची दखल घेऊन देण्यात आला आहे. हा आंतरराज्य पुरस्कार वितरण सोहळा बेळगाव येथे २८ मार्च रोजी होणार असून, या फाउण्डेशनने यशवंत खाडे हे सांगरूळ, ता.करवीर येथील ग्रामीण भागातील शेतकरी आहेत. सांगरूळ शिक्षणसंस्था ग्रुपचे संस्थापक सेक्रेटरी स्व. डी.डी. असगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेमध्ये सन १९९१ पासून संचालक म्हणून त्यांनी काम केले आहे. तसेच ते सांगरूळ शिक्षणसंस्थेचे विद्यमान अध्यक्ष व प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंगचे संचालक म्हणून कार्यरत आहेत तसेच शिवाजी विद्यापीठाच्या सिनेट सदस्य म्हणून तीन वर्षे त्यांनी काम केले आहे. त्याच बरोबर सांगरूळच्या पांडुरंग सहकारी सेवा संस्थेचे त्यांनी चेअरमन व पदाधिकारी ही पदेही भूषविली आहेत.

Web Title: Award announced to Yashwantrao Khade, President of Sangrul Educational Institution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.