आवाडेंची भेट तर कोरेंशी चर्चा, फडणवीस यांचे कोल्हापुरात स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 21:29 IST2021-02-11T21:28:20+5:302021-02-11T21:29:50+5:30
Devendra Fadnavis politics Kolhapur- विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंदर फडणवीस यांचे गुरूवारी रात्री कोल्हापूरमध्ये स्वागत करण्यात आले. खासदार संभाजीराजे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी फडणवीस आले होते. रात्री न्यू पॅलेसवरूनच ते पुण्याला रवाना झाले.

आवाडेंची भेट तर कोरेंशी चर्चा, फडणवीस यांचे कोल्हापुरात स्वागत
कोल्हापूर -विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे गुरूवारी रात्री कोल्हापूरमध्ये स्वागत करण्यात आले. खासदार संभाजीराजे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी फडणवीस आले होते. रात्री न्यू पॅलेसवरूनच ते पुण्याला रवाना झाले.
येथील हॉटेलवर फडणवीस आल्यानंतर देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, माजी खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार सुरेश हाळवणकर, भाजप महानगर जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे, संघटन मंत्री बाबा देसाई, राहूल देसाई यांनी त्यांचे स्वागत केले. माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील हे फडणवीस यांच्यासोबत गाडीतून आले.
यानंतर फडणवीस हॉटेलमध्ये काही काळ थांबून न्यू पॅलेसकडे रवाना झाले. त्याआधी गडबडीतच आलेल्या आमदार प्रकाश आवाडे यांनी शाल, पुष्पगुच्छ देवून फडणवीस यांचे स्वागत केले. तर त्यानंतर वेळातच आमदार विनय कोरे या ठिकाणी आले.
यावेळी माजी जिल्हाध्यक्ष हिंदूराव शेळके, अशोक देसाई, विजय जाधव, भगवान काटे, अजित ठाणेकर, विजयसिंह पाटील, विजय अगरवाल, दिलीप मैत्राणी उपस्थित होते. फडणवीस यांचे स्वागत झाल्यानंतर बाहेर पडणाऱ्या आवाडे, हाळवणकर यांनी एकमेकांची चौकशी केली.