अवनिच्या मुलांनी लुटला आनंद.
By Admin | Updated: March 11, 2017 16:37 IST2017-03-11T16:37:00+5:302017-03-11T16:37:00+5:30
आलिशान एसी हॉल, समधुर संगीत आणि फुगे देऊन केलेले स्वागत त्यामुळे खुललेले चेहरे ... अशा रंगलेल्या सोहळ्यात अवनिच्या मुलांनी डी.वाय.पी. सिटी मॉल

अवनिच्या मुलांनी लुटला आनंद.
युएसके फाउंडेशनचा उपक्रम :
कोल्हापूर : आलिशान एसी हॉल, समधुर संगीत आणि फुगे देऊन केलेले स्वागत त्यामुळे खुललेले चेहरे ... अशा रंगलेल्या सोहळ्यात अवनिच्या मुलांनी डी.वाय.पी. सिटी मॉल येथील मॅकडोनाल्डमधील अल्पोपाहाराचा आनंद लुटला. गरीब मुलांनाही ह्यमॅकडोनाल्डह्णसारख्या महागड्या खाद्यगृहातील पदार्थाची चव चाखता यावी यासाठी युएसके फाउंडेशनतर्फे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी युएसके फाउंडेशनच्या अध्यक्षा उषा काकडे, मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर, ह्यअवनिह्णच्या अनुराधा भोसले, नगरसेविका नीलोफर आजरेकर, वर्षा मोरे, नीता पच्छिंद्रे, अलका सोमोशी, रोहिणी वाकडे आदी उपस्थित होते.
महागड्या रेस्टॉरंटमध्ये जाणं प्रत्येकाला शक्य असतेच असे नाही. त्यातही ह्यअवनिह्णसारख्या अनाथाश्रमात राहणाऱ्या मुलांना अशा गोष्टी म्हणजे स्वप्नवतच पण आज ते स्वप्न सत्यात उतरले. निरागस मुलांच्या चेहऱ्यावर ह्यमॅकडोनाल्डह्णमध्ये अल्पोपाहार घेताना आनंद ओसंडून वाहत होता. रेस्टॉरंटमधील पन्नास रुपयांपासून ते दोनशे रुपयांपेक्षा जास्त किमतीचे फास्ट फूड, कोक, पेयजल, बर्गर आदी पदार्थांचा आस्वाद त्यांनी घेतला.