चांदी देण्यास टाळाटाळ; उद्योजकांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:27 IST2021-07-30T04:27:26+5:302021-07-30T04:27:26+5:30

याबाबत पोलिसांतून समजलेली माहिती अशी- चांदीचे दागिने तयार करण्यासाठी आवश्यक असणारे डिझाइन्स व साखळी, आदी साहित्य तमिळनाडूतील सेलम येथून ...

Avoid giving silver; Crimes against entrepreneurs | चांदी देण्यास टाळाटाळ; उद्योजकांवर गुन्हा

चांदी देण्यास टाळाटाळ; उद्योजकांवर गुन्हा

याबाबत पोलिसांतून समजलेली माहिती अशी- चांदीचे दागिने तयार करण्यासाठी आवश्यक असणारे डिझाइन्स व साखळी, आदी साहित्य तमिळनाडूतील सेलम येथून तयार करून घेण्यात येते. सयाजीराव सिल्व्हर फर्म यांनी त्यांना आवश्यक असणारे सुमारे २० लाख रुपये किमतीचे ५० किलो चांदीचे साहित्य मागविले होते. सेलमहून आलेली या चांदीची पार्सल्स चांदी उद्योजक अभिषेक सौंदते यांच्या दुकानांत ठेवण्यात आली होती. सयाजीराव सिल्व्हर फर्मचे कर्मचारी ही पार्सल आणण्यासाठी गेले असता सौंदते यांनी देण्यास टाळाटाळ चालविली होती. याबाबत हुपरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांच्याकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे जिल्हा पोलीसप्रमुख शैलेश बलकवडे यांच्याकडे या प्रकरणी दाद मागण्यात आली. बलकवडे यांनी आदेश देताच हा गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: Avoid giving silver; Crimes against entrepreneurs