शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

कांद्याला तीन वर्षांतील उच्चांकी दर,गतवर्षीपेक्षा दरात सरासरी ४० रुपयांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 00:55 IST

राजाराम लोंढे ।कोल्हापूर : मागील तीन-चार वर्षे घसरलेल्या दराने कांदा उत्पादक शेतकºयांना रडवले होते. मातीमोल दराने कांदा विक्री करावा लागल्याने शेतकºयांचे मोठे नुकसान झाले; पण गतवर्षीच्या तुलनेत कांद्याची आवक एक लाख क्विंटलने वाढूनही दरात सरासरी प्रतिकिलो ४० रुपयांची वाढ झाली आहे. आॅगस्टपासून दराने कमालीची उसळी खाली असून, एक नंबर कांद्याचा ...

ठळक मुद्दे आवकही एक लाख क्विंटलने वाढलीगेले तीन महिने शेतकºयांना चांगला दर मिळत आहे

राजाराम लोंढे ।कोल्हापूर : मागील तीन-चार वर्षे घसरलेल्या दराने कांदा उत्पादक शेतकºयांना रडवले होते. मातीमोल दराने कांदा विक्री करावा लागल्याने शेतकºयांचे मोठे नुकसान झाले; पण गतवर्षीच्या तुलनेत कांद्याची आवक एक लाख क्विंटलने वाढूनही दरात सरासरी प्रतिकिलो ४० रुपयांची वाढ झाली आहे. आॅगस्टपासून दराने कमालीची उसळी खाली असून, एक नंबर कांद्याचा दर प्रतिकिलो ५५ रुपये असून, गेल्या तीन वर्षांतील हा उच्चांकी दर राहिला आहे.

कांद्याचे उत्पादन सुरू झाले की दर घसरणे नवीन नाही. गेली तीन-चार वर्षे राज्यातील कांदा उत्पादक शेतकºयांच्या दृष्टीने फारच अडचणीची गेली. बाजार समितीत कांदा घेऊन आल्यानंतर दर पडल्याने अनेकवेळा मोकळे गोणपाट घेऊनच घरी परतावे लागले. जरा दर वाढू लागले की कांद्याची आवक झाल्याने पुन्हा दर पडत होते. त्यामुळे कांदा उत्पादक कमालीचा त्रस्त झाला होता. नाशिक ही कांद्याची मोठी बाजारपेठ आहे; पण अहमदनगर, पुणे, बीड, सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी कोल्हापूर बाजारपेठेकडेच आकर्षित होत असल्याने येथे कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक होते.

विशेष म्हणजे स्थानिकची एक पिशवीही आवक नसताना रोज १५ हजार पिशव्यांची आवक समितीत होते आणि तेवढी विक्रीही होते. गोवा, कोकणात येथून कांदा पाठविला जातो. त्यामुळे दर चांगला आणि रोखीने पैसे मिळत असल्याने शेतकºयांचा कल या मार्केटकडे अधिक आहे. दोन वर्षे झाले दरात घसरण सुरू आहे. मे २०१७ मध्ये तर घाऊक बाजारात प्रतिकिलो दीड रुपयाने कांदा विकावा लागल्याने शेतकºयांचे कंबरडे मोडले.

या कालावधीत साडेआठ रुपये उच्चांकी दर राहिला. जूनमध्ये दरात फारसा फरक पडला नाही. प्रतिकिलो २ ते ११ रुपये, तर जुलैमध्ये २ ते १७ रुपयांपर्यंत दर राहिला.आॅगस्टपासून आवकही वाढू लागली आणि दरही वाढू लागले. आॅगस्ट महिन्यात १ लाख २२ हजार ७१० क्विंटलची आवक झाली आणि सरासरी ५ ते २९ रुपयांपर्यंत दर राहिले. आॅक्टोबरमध्ये आवक ७६ हजार क्विंटलवर आली आणि ४१ रुपये किलोपर्यंत दर पोहोचला. नोव्हेंबरमध्ये लाख क्विंटलपर्यंत आवक पोहोचली पण त्याबरोबर १० ते ५५ रुपयांपर्यंत दरही राहिला. डिसेंबरच्या २१ दिवसांत १ लाख ७० हजार क्विंटलची आवक होऊनही ५३ रुपयांपर्यंत दर आहे. गेल्या तीन वर्षांत सलग दोन महिने सरासरी ४० च्या वर दर राहिलेच नाहीत. यावेळेला मात्र गेले तीन महिने शेतकºयांना चांगला दर मिळत आहे.आवक, दर पुढीलप्रमाणेकालावधी आवक क्विंटल दर प्रतिकिलोएप्रिल ते नोव्हेंबर २०१६ १० लाख ८ हजार १७ ५ ते १५एप्रिल ते नोव्हेंबर २०१७ ११ लाख १८ हजार ४९० १० ते ५५

टॅग्स :Marketबाजारkolhapurकोल्हापूर