शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

'गोकुळ'चे गेल्या २५ वर्षापासूनचे लेखापरीक्षण करा, आमदार सतेज पाटलांची मागणी  

By भीमगोंड देसाई | Updated: January 19, 2023 15:33 IST

..यामुळे याला राजकीय वास

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे (गोकुळ) गेल्या २५ वर्षापासूनचे लेखा परीक्षण करावे, अशी मागणी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी आज, गुरूवारी केली. 

विरोधी आघाडीच्या संचालिका शौमिका महाडिक यांच्या तक्रारीनंतर शासनाने गोकुळचे सन २०२१-२२ या आर्थिक वर्षाचे चाचणी लेखा परीक्षण करण्याचे आदेश लेखा परीक्षा मंडळाचे विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांना नुकतेच दिले आहे. यावर पत्रकारांनी विचारल्यानंतर आमदार पाटील यांनी ही मागणी केली. लेखापरीक्षण सध्याचेच का? पंचवीस वर्षपासूनचे करा असेही ते म्हणाले. गोकुळमध्ये यापूर्वी अनेक वर्षे माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या नेतृत्वाखाली सत्ता होती. सन २०२१ मध्ये आमदार पाटील आणि माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने सत्तांतर केले. यामध्ये विरोधी आघाडीतून शौमिका महाडिक संचालिका झाल्या.

महाडिक यांनी गोकुळच्या वार्षिक सभेनंतर चार महिने मी शांत होते. संघात चाललेल्या गैरकारभाराचे पुरावे जमवत होते. त्याचे फळ लवकरच समोर येईल, असे सोशल मीडियातून स्पष्ट केले होते. त्यानंतर लेखा परीक्षणाचा आदेश आला. यामुळे याला राजकीय वास येत आहे. यापार्श्वभूमीवर सत्ताधारी आघाडीचे नेते आमदार पाटील यांनी गोकुळच्या २५ वर्षापासूनच्या लेखा परीक्षणाची मागणी करीत मोजक्याच शब्दात प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरGokul MilkगोकुळSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटील