शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: शेतकरी संघाच्या इमारतीत भाविकांचा कोंडमाराच, कृती समितीने असुविधांकडे वेधले लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2023 11:48 IST

नवरात्रोत्सवात अंबाबाई मंदिरात येणाऱ्या भाविकांची दर्शनरांग या इमारतीमधून सुरू होणार

कोल्हापूर : नवरात्रोत्सवात अंबाबाई मंदिरात येणाऱ्या भाविकांची सोय करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शेतकरी संघाची इमारत घेतली खरी, मात्र या इमारतीचे फायर ऑडिट झालेले नाही, पुरेशा सूर्यप्रकाश नाही, इलेक्ट्रिक ऑडिट नाही, अग्निशामक साहित्याचा अभाव, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही, अशा असंख्य असुविधा असताना या इमारतीत भाविकांना उभे करून त्यांचा कोंडमारा का करता? असा सवाल कोल्हापूर शहर कृती समितीने बुधवारी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अधिकाऱ्यांना केला. कृती समितीचे बाबा इंदूलकर, बाबा पार्टे, आर. के. पोवार यांनी या इमारतीमधील अनेक असुविधांची पोलखोलच केली.नवरात्रोत्सवात अंबाबाई मंदिरात येणाऱ्या भाविकांची दर्शनरांग या इमारतीमधून सुरू होणार आहे. तशी व्यवस्था या इमारतीमध्ये केली आहे. मात्र, या इमारतीत भाविकासांठी कोणत्याच सुविधा नसल्याचे लक्षात येताच कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी सायंकाळी या इमारतीची पाहणी केली. या इमारतीमध्ये एका वेळी दोन हजार भाविकांना दर्शन रांगेत उभे राहता येणार असल्याचे देवस्थान समितीचे व्यवस्थापक महादेव दिंडे यांनी सांगितले.मात्र, इतक्या कमी जागेत भाविकांना कसे उभे करणार? काही दुर्घटना घडून चेंगराचेंगरी झाली तर याला जबाबदार कोण, असा सवाल इंदूलकर यांनी केला. या भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था काय? या प्रश्नावर अधिकारीही निरुत्तर झाले. जागेची क्षमता, भाविकांची संख्या, फायर ऑडिट याचा कोणताच अभ्यास न करता या इमारतीत भाविकांसाठी दर्शनरांग का केली?, बाहेर इतकी मोठी जागा असताना असुविधा असणारी इमारत ताब्यात घेण्यामागे प्रशासनाचे काळंबेरं दिसत असल्याचा आरोप इंदूलकर यांनी केला.

भाविकांसाठी अवघे अवघे आठ शौचालयया इमारतीत पुरुषांसाठी पाच तर महिलांसाठी तीन शौचालये उभी केल्याचे देवस्थान समितीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, या इमारतीत एकावेळी दर्शनरांगेतील भाविकांची संख्या पाहता ही शौचालये अपुरी पडतील याकडे कृती समितीने लक्ष वेधले. दर्शनरांगेतील भाविकांसाठी लाकडी बाकडे ठेवण्याच्या मागणीला देवस्थान समितीच्या अधिकाऱ्यांनी सकारात्मकता दर्शविली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूरNavratriनवरात्री