शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Crime: पूर्ववैमनस्यातून घरात घुसून बाळाला मारण्याचा प्रयत्न, महिलेचा केला विनयभंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2023 12:19 IST

तुमचा वंश जिवंत ठेवत नाही, असे म्हणत गळा दाबण्याचा प्रयत्न

इचलकरंजी : कोरोची (ता.हातकणंगले) येथे पूर्ववैमनस्यातून तिघांनी एका घरात घुसून महिलेचा विनयभंग केला तसेच सव्वा महिन्याच्या बाळाचा गळा दाबण्याचा प्रयत्न करत दहशत माजवली. याप्रकरणी तिघांवर शहापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून दोघांना अटक केली आहे. विकी अशोक माने (रा. राममंदिरजवळ, कोरोची) व ओंकार पांडुरंग रानभरे ( २३, रा. चव्हाणवाडी, कोरोची) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांना येथील न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणातील तिसरा संशयित अनोळखी असून, पोलिस या दोघांच्या माध्यमातून त्याचा शोध घेत आहेत.याबाबत मिळालेली माहिती अशी, तक्रारदार महिलेचा पती आणि वरील तिघे संशयित यांच्यात पूर्वीचा वाद आहे. त्यावेळी पीडित महिलेच्या पतीने या संशयितांना मारहाण केली होती. त्याच्यावरही त्यावेळी गुन्हा दाखल झाला होता. तो सध्या जामिनावर बाहेर आला आहे. तो आल्याचे समजताच संशयितांनी कोयता घेऊन त्याच्या घरात घुसले. मात्र, तो घरात नव्हता. त्यामुळे संशयितांनी महिलेच्या हातातील सव्वा महिन्याच्या बाळाला हिसकावून घेतले. तुमचा वंश जिवंत ठेवत नाही, असे म्हणत त्याचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी महिलेने प्रतिकार केला असता तिच्याशी झटापट करून अंगावरील वस्त्रे फाडून तिचा विनयभंग केला तसेच त्यावेळी सासू आणि नणंद यांनी मध्ये पडल्याने त्यांनाही धक्काबुक्की करत शिवीगाळ केल्याचे पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस