शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

वीज कनेक्शन तोडल्यानं शेतकऱ्याचा थेट महावितरण कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न, धक्कादायक व्हिडिओ समोर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2022 18:33 IST

कोल्हापुरातील अनेक गावातील विजेचे कनेक्शन तोडले जात असून यामुळे शेतकरी आता चांगलेच संतप्त झालेले दिसून येत आहेत.

कोल्हापुरातील अनेक गावातील विजेचे कनेक्शन तोडले जात असून यामुळे शेतकरी आता चांगलेच संतप्त झालेले दिसून येत आहेत. अनेक गावात वीज कनेक्शन तोडल्याने शेतीला पाणी न मिळाल्याने शेतीचे नुकसान होत आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे. या सर्व प्रकारामुळे संतापलेल्या एका शेतकऱ्याने चक्क आत्मदहनाचा प्रयत्न महावितरण कार्यालयातच केला.

कोल्हापुरात शेतकऱ्यांचे विजेचे कनेक्शन तोडल्याने  महावितरणच्या कार्यालयातच कार्यकारी अभियंता यांच्यासमोर डिझेल अंगावर ओतून शेतकऱ्याने आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. गावातील वीज कोणतीही पूर्वसूचना न देता तोडण्यात येत असल्याने सोमवारी आक्रमक गावकऱ्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना जाब विचारण्यास आले होते. महे ,कसबा बीड, वाशी या गावांसह पंचक्रोशीतील ग्रामस्थ तब्बल तासभर अधिकाऱ्यांची वाट बघत होते. सोबतच ते डिझेलचा कॅन ही शेजारी घेऊन बसले होते मात्र तरीही अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे लक्ष न दिल्यामुळे शेतकरी आक्रमक झाले अन् एकच राडा झाला.

शेतकऱ्यांनी वीज कनेक्शन तोडल्याच्या निषेधार्थ महावितरणचे कार्यकारी अभियंता डी. एस. पाटील यांच्यासमोर डिझेल अंगावर ओतून आत्मदहन करण्याचा यावेळी प्रयत्न केला. यावेळी कार्यालयात एकच गोंधळ उडाला. अंगावर डिझेल ओतल्यामुळे शेतकऱ्याच्या खिशात असणारी काडेपेटी भिजल्याने आणि उपस्थित अधिकाऱ्यांनी त्याला रोखल्याने पुढील अनर्थ टळला आहे. मात्र महावितरणचे अधिकारी आणि शेतकरी, गावकरी यांच्यामध्ये चांगलीच शाब्दिक चकमक झाली. वीज कनेक्शन अनेक गावातील तोडले जात असून यामुळे होणारे शेतीचे नुकसान अधिक आहे. त्यामुळेच कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी आता आक्रमक झालेले दिसून येत आहेत.

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरelectricityवीजFarmerशेतकरी