दुंडगेत येथे विवाहितेवर अत्याचाराचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2020 04:21 AM2020-12-09T04:21:21+5:302020-12-09T04:21:21+5:30

गडहिंग्लज : दुंडगे (ता. गडहिंग्लज) येथील नवीन वसाहतीमध्ये माहेरी राहणाऱ्या विवाहितेवर जबरदस्तीने अत्याचार करण्याचा प्रयत्न करणाऱ्याला आजूबाजूच्या तरुणांनी पाठलाग ...

Attempted atrocity on a married woman at Dundget | दुंडगेत येथे विवाहितेवर अत्याचाराचा प्रयत्न

दुंडगेत येथे विवाहितेवर अत्याचाराचा प्रयत्न

Next

गडहिंग्लज : दुंडगे (ता. गडहिंग्लज) येथील नवीन वसाहतीमध्ये माहेरी राहणाऱ्या विवाहितेवर जबरदस्तीने अत्याचार करण्याचा प्रयत्न करणाऱ्याला आजूबाजूच्या तरुणांनी पाठलाग करून पकडले आणि पोलिसांनी ताब्यात दिले. सुनील जंबू मादर (मूळगाव बेळवी, ता. हुक्केरी, सध्या रा. दुंडगे, ता. गडहिंग्लज) असे संशयिताचे नाव आहे.

पोलीस व ग्रामस्थांतून मिळालेली माहिती अशी, दुंडगे येथील पीडित युवतीचा दोन वर्षांपूर्वी विवाह झाला आहे. परंतु, कौटुंबिक कारणामुळे ती माहेरीच राहते. मंगळवारी (दि. ८) सकाळी सव्वाआठच्या सुमारास ती आपल्या घराच्या दारात उभी होती. त्यावेळी सुनील याने तिला दादा घरात आहे का, असे विचारत घरात ओढून नेले आणि तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. तिने आरडाओरडा केल्यामुळे तिची चुलती व चुलत बहीण धावून आले. त्यामुळे सुनीलने तेथून पळ काढला.

शेतवडीतून तो गडहिंग्लजच्या दिशेने जात असल्याची माहिती मिळताच परिसरातील तरुणांनी त्याचा पाठलाग करून नेवडेतळानजीक त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

पीडित तरुणीच्या फिर्यादीवरून पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

दरम्यान, संशयित तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी पीडितेच्या नातेवाइकांसह तरुणांनी पोलीस ठाण्यासमोर काहीकाळ ठिय्या मांडला होता. माजी आमदार श्रीपतराव शिंदे व बाळेश नाईक यांनीही पोलीस निरीक्षक प्रकाश गायकवाड यांची भेट घेऊन आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली.

------------------------

* संशयित आरोपी सुनील याने दुंडगे येथे नवीन वसाहतीमध्ये वाहनांच्या पेंटिंगचा व्यवसाय सुरू केला आहे. आई-वडिलांसह तो आपल्या नातेवाइकांच्या घरी राहतो. यापूर्वी त्याने हुबळी येथेही असाच प्रकार केल्याची चर्चा ग्रामस्थांत सुरू होती.

------------------------

* दुंडगेतील तरुणांचे धाडस

पाठलाग करून पकडायला येणाऱ्या तरुणांवर दगडफेक करून त्यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकारही आरोपीने केला. परंतु, धाडसाने तरुणांनी त्याला पकडले.

------------------------

Web Title: Attempted atrocity on a married woman at Dundget

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.