शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

प्रसिद्ध राजाभाऊ भेळच्या मालकांवर प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न, नागरीकांनी दोघा हल्लेखोरांना बेदम चोपले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2022 19:05 IST

कोल्हापूर : कोल्हापुरातील प्रसिद्ध राजाभाऊ भेळचे मालक रविंद्र उर्फ बापू शिंदे (रा. मंगळवार पेठ) यांच्यावर तिघांनी सशस्त्र प्राणघातक हल्ल्याचा ...

कोल्हापूर : कोल्हापुरातील प्रसिद्ध राजाभाऊ भेळचे मालक रविंद्र उर्फ बापू शिंदे (रा. मंगळवार पेठ) यांच्यावर तिघांनी सशस्त्र प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न  केला. यातील दोघांना संतप्त नागरिकांनी घटनास्थळी पकडून बेदम चोप दिला. हल्लेखोरांचा साथीदार पळून गेला.  नेहमी गजबजलेल्या शाहू खासबाग मैदान परिसरात दुपारच्या सुमारास हा प्रकार घडला. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी जुना राजवाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, राजाभाऊ भेळचे मालक रवींद्र शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी शाहू मैदान चौकातील एका गाळ्यात भेळचा स्टॉल सुरू केला. चार दिवसापूर्वी रात्री उशीरा अज्ञात दोघांनी खाऊ गल्लीतील भेळच्या गाडीवर दगड मारला होता. दरम्यान, मंगळवारी रात्री तिघे त्यांच्या स्टॉलवर भेळ खाण्यासाठी पुन्हा आले.  

शेजारील कट्ट्यावर बसून भेळ खाताना त्यांनी आपल्याकडील शस्त्रे दाखवली. त्यातीलच एक संशयित आज, दुपारी स्टॉलवर आला. त्याने भेळ मागितली. त्याचे दोन साथीदार तेथे आले. कर्मचाऱ्यांनी त्यांना भेळ दिली. एक जण पान खाऊन स्टॉल जवळच थुंकला. त्याबाबत कर्मचाऱ्यांनी त्यांना जाब विचारला. दरम्यान एकाने शस्त्र काढून शिंदेंवर हल्याचा प्रयत्न केला. शिंदे यांनी प्रसंगावधान राखून त्याला ढकलून दिले. हा प्रकार पाहून नागरिक मदतीसाठी धावले. दरम्यान हल्ल्याचा प्रयत्न करणाऱ्याने तेथून पळ काढला. मात्र दोघांना पकडून नागरिकांनी  बेदम चोप दिला. जुना राजवाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोघा संशयितांना ताब्यात घेतले आहे. तर, पसार झालेल्या संशयिताचा शोध सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच शिंदे यांचे नातेवाईक व मित्रपरिवार आणि जुना राजवाडा पोलिस ठाण्यासमोर गर्दी केली होती.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारी