कळंबा कारागृहातील कैद्यांना गांजा, मोबाईल पुरविण्याचा पुन्हा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:21 IST2020-12-24T04:21:25+5:302020-12-24T04:21:25+5:30

कोल्हापूर : कळंबा मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांना पुन्हा एकदा गांजा पुरविण्याचा प्रयत्न झाला. तेथील सुरक्षा यंत्रणा पुन्हा चव्हाट्यावर आली. चारचाकी ...

Attempt to supply cannabis and mobile phones to inmates of Kalamba Jail | कळंबा कारागृहातील कैद्यांना गांजा, मोबाईल पुरविण्याचा पुन्हा प्रयत्न

कळंबा कारागृहातील कैद्यांना गांजा, मोबाईल पुरविण्याचा पुन्हा प्रयत्न

कोल्हापूर : कळंबा मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांना पुन्हा एकदा गांजा पुरविण्याचा प्रयत्न झाला. तेथील सुरक्षा यंत्रणा पुन्हा चव्हाट्यावर आली. चारचाकी वाहनातून दोघा अज्ञातांनी सुरक्षा भिंतीवरून तीन गठ्ठे कारागृहाच्या आतील आवारात फेकल्याचा प्रकार मंगळवारी दुपारी घडला. कारागृहातील सुरक्षारक्षकांनी तातडीने संबधित गठ्ठे ताब्यात घेतले. तिन्हीही गठ्ठ्यात एकूण पाऊण किलो गांजा, दहा मोबाईल संच, दोन पेनड्राईव्ह, पाच चार्जिंग कॉड असा सुमारे १५ हजार ७२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याबाबत जुना राजवाडा पोलिसांत अज्ञात दोघांविरोधात गुन्हा नोंदविला.

मंगळवारी कोल्हापूर ते गारगोटी मार्गावरील कारागृहाची तटबंदी क्र. १ समोरील फूटपाथनजीक चारचाकी वाहन थांबले. त्यातून दोघे उतरले. त्यांनी तीन मोठे गठ्ठे कारागृहाच्या उंच भिंतीवरून आत फेकले. त्यानंतर वाहन निघून गेले. हे कारागृह सुरक्षा रक्षकाच्या निदर्शनास आले. त्यांनी तातडीने ते गठ्ठे ताब्यात घेतले. प्रत्येक गठ्ठ्यात कमी-जास्त प्रमाणात गांजा, मोबाईल संच आदी सुमारे १५ हजार ७२५ रुपयांचा मुद्देमाल आढळला.

रुमालात गुंडाळला गांजा

गांजा, मोबाईल संच, चार्जिंग कॉड, पेन ड्राईव्ह हे तिन्हीही गठ्ठ्यात साहित्य आढळले. साहित्य रुमालात व प्लास्टिक आवरणाने चिकटटेपने गठ्ठा केला होता. त्यावर ‘व्ही सील’ असे नमूद होते. तीन गठ्ठे कारागृहाच्या सुरक्षा भिंतीवरून आत फेकले.

वाहन देवकर पाणंदकडे

हे गठ्ठे सुरक्षा भिंतीवरून आत फेकल्यानंतर वाहन वेगाने धावले. कळंबा जकात नाक्याजवळील साई मंदिरापासून यू टर्न मारून पुन्हा मोरे-माने नगरमार्गे देवकर पाणंदच्या दिशेने गायब झाले. सुरक्षा रक्षकांनी परिसरातील सीसीटिव्ही कॅमेरे तपासले, संशयित वाहन यू टर्न मारून देवकर पाणंद दिशेने गायब झाले. त्याचा पोलीस कसून शोध घेत आहेत.

सुरक्षा व्यवस्था ऐरणीवर

दीड महिन्यापूर्वी कळंबा कारागृहात कैद्यांना गांजा पुरविण्यासाठी तो बॉलमध्ये भरून तटबंदीवरून कारागृहात फेकण्याचा प्रयत्न झाला. त्याप्रकरणी पुण्यातील तिघांना अटक झाली होती. त्यानंतर कारागृहात मोबाईल संचही सापडले आहेत.

(तानाजी)

Web Title: Attempt to supply cannabis and mobile phones to inmates of Kalamba Jail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.