पत्नीला फिनेल पाजून ठार मारण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 00:47 IST2017-12-25T00:47:44+5:302017-12-25T00:47:44+5:30

An attempt to kill wife | पत्नीला फिनेल पाजून ठार मारण्याचा प्रयत्न

पत्नीला फिनेल पाजून ठार मारण्याचा प्रयत्न


कोल्हापूर : सुर्वे कॉलनी, ताराबाई पार्क येथे कौटुंबिक वादातून पत्नीला फिनेल पाजून ठार मारण्याचा प्रयत्न केला. अ‍ॅजलीन जोसेफ गौस (वय ३६) असे जखमीचे नाव आहे. या प्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी पती संशयित संग्राम विश्वास चांदेकर (३४, रा. गारगोटी, ता. भुदरगड) यांचेवर गुन्हा दाखल केला.
अधिक माहिती अशी, अ‍ॅजलीन गौस व संशयित संग्राम चांदेकर हे नात्याने पती-पत्नी आहेत. संग्राम हा गौस यांच्याच घरी राहतो.
गौस यांच्या मुलाचा वारंवार राग धरून त्याला मारहाण करत असे. दि. २२ डिसेंबरला संग्रामने पत्नी अ‍ॅजलीन यांना कौटुंबिक वादातून शिवीगाळ करत मारहाण केली. त्यानंतर फिनेल पाजून ठार मारण्याचा प्रयत्न केला. फिनेल पोटात गेल्याने अ‍ॅजलीन या बेशुद्ध पडल्या. त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल केले. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संग्राम चांदेकर याचेवर गुन्हा दाखल केला. याप्रकणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून तपास सुरू आहे.

Web Title: An attempt to kill wife