वरिष्ठाच्या त्रासाला कंटाळून आतिग्रे आरोग्य सेवकाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:16 IST2021-07-05T04:16:07+5:302021-07-05T04:16:07+5:30
वरिष्ठ सुपरवायझरच्या त्रासाला कंटाळून अतिग्रे (ता. हातकणंगले) प्राथमिक आरोग्य उपकेंद्रामध्ये आरोग्य सेवक रमेश धोंडीराम कोरवी (वय ४०, रा. रंकाळा ...

वरिष्ठाच्या त्रासाला कंटाळून आतिग्रे आरोग्य सेवकाची आत्महत्या
वरिष्ठ सुपरवायझरच्या त्रासाला कंटाळून अतिग्रे (ता. हातकणंगले) प्राथमिक आरोग्य उपकेंद्रामध्ये आरोग्य सेवक रमेश धोंडीराम कोरवी (वय ४०, रा. रंकाळा तलाव मागे हरिओम नगर, कोल्हापूर) यांनी शनिवार रात्री उशिरा उपकेंद्रामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या खिशातून पोलिसांना एक चिठ्ठी सापडली आहे. यामध्ये वरिष्ठ सुपरवायझर सुरेश वसंत वर्णे (रा. आपटे नगर कोल्हापूर ) यांच्यासह इतराची नावे असल्याने पोलिसानी वर्णे यांना ताब्यात घेतले आहे. या बाबतची तक्रार सुरेश धोंडीराम कोरवी यांनी पोलीस ठाण्यामध्ये दाखल केली आहे.
आरोग्य सेवक रमेश कोरवी अतिग्रे प्राथमिक आरोग्य उपकेंद्रामध्ये नोकरीस होते. शनिवारी ५० नागरिकांचे लसीकरणाचे काम संपल्यानंतर सर्व कर्मचारी गेल्यानंतरही ते उशिरापर्यंत तेथेच थांबून होते. रात्री ११ वा त्यांच्या नातेवाइकानी फोनवरून उपकेंद्राकडील कर्मचारी आणि गावातील संबंधितांकडे चौकशी केली. उपकेंद्राचा दरवाजा बंद असल्याने कोणीही गाभीर्याने घेतले नाही. रमेश कोरवी यांनी उपकेंद्रामध्येच शनिवारी रात्री उशिरा आत्महत्या केल्याचे रविवारी सकाळी उघडकीस आले. आत्महत्येची घटना समजताच त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक आणि हेर्ले आरोग्य केंद्रातील कर्मचारी, पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यावेळी पोलिसांना रमेश कोरवी यांच्या खिशामध्ये एक चिठ्ठी मिळाली. यामध्ये वरिष्ठ आणि स्थानिक पदाधिकारी त्रास देत असल्याने आत्महत्या करत असल्याचा उल्लेख केला आहे. घटनास्थळी पंचनामा करून पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी हातकणंगले ग्रामीण रुग्णालयामध्ये हलविला आहे. या आत्महत्येचा गुन्हा पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाला आहे.
चौकट
मृत रमेश कोरवी यांच्या मुलगा व मुलीने घटनास्थळीच हंबरडा फोडला. आमच्या वडिलांना ग्रामपंचायतीचे दोन पदाधिकारी आणि हेरले आरोग्य केंद्राकडील वरिष्ठांकडून त्रास दिला जात होता म्हणूनच त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगत होते.
फोटो = ०४ रमेश धोंडीराम कोरवी