राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत अथर्व पाटील याची ‘सुवर्ण’ कामगिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:23 IST2021-03-24T04:23:13+5:302021-03-24T04:23:13+5:30
कोल्हापूर : देवकर पाणंद येथील अथर्व शहाजी पाटील याने बेंगलोर येथे दि. २० ते २२ मार्च दरम्यान झालेल्या २० ...

राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत अथर्व पाटील याची ‘सुवर्ण’ कामगिरी
कोल्हापूर : देवकर पाणंद येथील अथर्व शहाजी पाटील याने बेंगलोर येथे दि. २० ते २२ मार्च दरम्यान झालेल्या २० व्या राष्ट्रीय दिव्यांग जलतरण अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्ण कामगिरी केली. त्याने या स्पर्धेत शंभर मीटर बटरफ्लाय प्रकारात सुवर्णपदकाची कमाई करत प्रथम क्रमांक पटकविला. ५० मीटर फ्री-स्टाइल प्रकारात कास्यपदकासह द्वितीय क्रमांक मिळविला. त्याला वडील शहाजी, आई सपना, प्रशिक्षक संजय पाटील, अनिल पवार, आदींचे मार्गदर्शन लाभले. वसंतराव देशमुख हायस्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या वर्गात अथर्व शिकत आहे. त्याने यापूर्वी मुंबईतील समुद्रात दोन किलोमीटर जलतरण करण्याच्या स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळविला होता. सिंधुदूर्गमधील समुद्रात दोन किलोमीटर जलतरण स्पर्धेत आणि गोंदिया येथील राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत ५० मीटर फ्री-स्टाइल आणि बटरफ्लाय प्रकारात यश मिळविले आहे.
फोटो (२३०३२०२१-कोल-अथर्व पाटील (जलतरण)
===Photopath===
230321\23kol_9_23032021_5.jpg
===Caption===
फोटो (२३०३२०२१-कोल-अथर्व पाटील (जलतरण)