अथर्व- दौलत कारखान्यामध्ये आजअखेर चार लाख ५००० मे. टनाचे गाळप झाले आहे. शेतकऱ्यांच्या विश्वासावरच इतके गाळप झाले आहे. ३१ जानेवारीअखेर ऊस बिले शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली असून ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी बँकेशी संपर्क साधावा. तसेच तोडणी वाहतूकदारांची बिलेसुद्धा अदा केली आहेत. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला संपूर्ण शिल्लक असणारा ऊस अथर्व- दौलतकडे पाठवून सहकार्य करावे. यावर्षी कारखान्याकडे उत्पादित झालेल्या कंपोस्ट खताची प्रति टन (रु. 630 जीएसटीसह) विक्री कारखाना साइटवरून सुरू आहे. तरी इच्छुक शेतकऱ्यांनी कारखाना साइटवर कंपोस्ट खत घेऊन जावे तसेच कार्यक्षेत्रातील संपूर्ण उसाचे गाळप झाल्यानंतर कारखाना बंद होईल, असेही खोराटे यांनी सांगितले.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}