शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

बानगेत ७० एकरातील ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी; शेतीसाहित्याचे मोठे नुकसान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2023 16:44 IST

कोल्हापूर जिल्ह्यातील कागल ताुलक्यातील बानगेत ७० एकरातील ऊस जळून खाक झाला. 

दत्ता पाटील

बानगे (कोल्हापूर) : येथील इनाम, सोनारकी पड ते गुजर यांचा शेतापर्यंत असणाऱ्या क्षेत्रात लागलेल्या आगीत सुमारे ७० एकराहून अधिक क्षेञातील ऊस जळून खाक झाला. यामध्ये ऊसासह पाईप, ठिबक सिंचन व इतर साहित्याचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून रस्त्याअभावी या परिसरातील ऊस पडून आहे. तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनीही या रस्त्यासाठी प्रयत्न केले. माञ, तोडगा न निघाल्याने रस्त्याचा प्रश्न जैसे थे आहे.याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. याच विभागात ४००एकराहून अधिक ऊस शिल्लक आहे. येथिल शेतकरी आणि तरुणांच्या प्रसंगावधानामुळे आग आटोक्यात आली. 

या ठिकाणी बिद्री व हमिदवाडा कारखान्याचा अग्नीशामक बंबही दाखल झाला होता.आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. यामध्ये महादेव धोंडी पाटील, निलेश पाटील, अशोक सावंत, तुकाराम सावंत, चंद्रकांत पाटील, भगतसिंग पाटील, प्रकाश पाटील-बंदूके, धनाजी शामराव पाटील, रामदास पाटील, तानाजी पाटील, विष्णू सावंत, बाबूराव पाटील यासह जवळपास ६०हून अधिक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याचा अंदाज आहे.

चार जनावरे बचावली...आग लागलेल्या ऊसक्षेञानजीकच आंनदी जाधव यांचा चार जनावरांचा गोठा आहे.प्रसंगावधानता बाळगत सरपंच युवराज पाटील व सामाजिक कार्यकर्ते सागर पाटील यांनी आपल्या मालकीचा बोअरवेल सुरू करून या गोठयासभोवती पाणी मारले तसेच, या जनावरांना सुरक्षित ठिकाणी हलविले. यासाठी योगेश जमनिक,भगवान पाटील,शरद पाटील यांनीही परिश्रम घेतले.

  

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFarmerशेतकरीfireआग